Kashedi Tunnel : कोकणात (Konkan) सध्या शिमगोत्सवाची धूम सुरू झाली आहे. कोकणातील प्रमुख सणांपैकी एक सण असलेल्या शिमगा उत्सवाला मुंबई व पुणे येथून लाखों चाकरमानी गावी येतात. या पार्श्वभूमीवर चाकरमान्यांचा प्रवास सुखद सुरक्षित आणि सुसाट होण्यासाठी कशेडी बोगद्याची दुसरी लेन सुरू झाली आहे. त्यातच मुंबई-गोवा महामार्गाचे (Mumbai-Goa Highway) चौपदरीकरण काम अद्याप अपूर्ण आहे. त्यामुळे कशेडी बोगद्यातून वाहतूक सुरु झाल्यास काही अंशी वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे. (Kashedi Tunnel)
(हेही वाचा – पीओपी मूर्तींबाबत सरकार सकारात्मक, न्यायालयात फेर याचिका दाखल करणार; CM Devendra Fadnavis यांची माहिती)
कशेडीच्या पहिल्या लेनमधून गणेशोत्सव काळात वाहनांना दुतर्फा ये जा करण्याची परवानगी देण्यात आली होती. परंतु ही वाहतूक (Traffic) धोकादायक बनली होती. त्यामुळे दुसऱ्या बोगद्याचे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी होत होती. नुकताच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिह राजे भोसले (Shivendrasinh Raje Bhosale) यांनी महामार्गाची पाहणी करून मार्च अखेर पर्यंत कशेडी बोगद्यातून दुसऱ्या मार्गिकेतून प्रवास सुरू होईल असे सांगितले होते. मंगळवार दि. ११ रोजीच दुसऱ्या बोगद्यातून वाहनान मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. कशेडी बोगद्याची दुसरी लेन सुरू झाली आहे. त्यामुळे दुसरी लेन वाहनचालकांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community