केदारनाथच्या पायी मार्गावर रविवारी (२१ जुलै) सकाळी मोठी दुर्घटना घडली आहे. या पायी मार्गावर दगड-माती कोसळल्याने अनेकजण जखमी झाले आहेत. तीन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून आठ जण जखमी झाले आहेत. मृत आणि जखमींमध्ये महाराष्ट्र आणि गुजरातमधील भाविकांचा समावेश आहे. (Kedarnath Landslide)
मृतांची नावे
- किशोर अरुण पराते, महाराष्ट्र, वय २१ वर्षे
- सुनील महादेव, महाराष्ट्र, वय २४ वर्षे
- अनुराग बिष्ट, तिलवाडा
जखमींची नावे
- चेला भाई चौधरी, गुजरात, वय २३ वर्षे
- जगदीश पुरोहित, गुजरात, वय ४५ वर्षे
- अभिषेक चौहान, महाराष्ट्र, वय १८ वर्षे
- धनेश्वर दांडे, महाराष्ट, उम्र २७ वर्षे
- हरदाना भाई पटेल, गुजरात, वय
बचावकार्य सुरु करण्यात आले असून तीन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांमध्ये महाराष्ट्राच्या दोघांचा समावेश आहे. चिरबासा परिसराजवळच्या मार्गावर सकाळी साडेसातच्या सुमारास डोंगरावरून मोठमोठाले दगड खाली पडू लागले, असे रुद्रप्रयाग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार (Nandan Singh Rajwar) यांनी सांगितले. (Kedarnath Landslide)
(हेही वाचा – NEET Paper Leak पेपर लीक प्रकरणातील आणखी एका सूत्रधाराला अटक; एमबीबीएसच्या दोन विद्यार्थ्यांवर कारवाई)
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (Uttarakhand CM Pushkar Singh Dhami) यांनी शोक व्यक्त केला आहे. केदारनाथ यात्रा मार्गाजवळील टेकडीवरून ढिगारा आणि मोठमोठे दगड पडल्यामुळे काही यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. बचावकार्य सुरु आहे. जखमींना चांगले उपचार देण्याच्या सूचना केल्या आहेत, असे ते म्हणाले. (Kedarnath Landslide)
केदारनाथ यात्रा मार्ग के पास पहाड़ी से मलबा व भारी पत्थर गिरने से कुछ यात्रियों के हताहत होने का समाचार अत्यंत दुःखद है। घटनास्थल पर राहत एवं बचाव कार्य जारी है, इस सम्बन्ध में निरंतर अधिकारियों के संपर्क में हूं। हादसे में घायल हुए लोगों को त्वरित रूप से बेहतर उपचार उपलब्ध…
— Pushkar Singh Dhami (@pushkardhami) July 21, 2024
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community