- विशेष प्रतिनिधी, मुंबई
केईएम रुग्णालयाच्या (KEM Hospital) आवारात कर्मचारी भवन तथा कर्मचारी वसाहत पाडून त्या जागी २१ मजली इमारत बांधली जात आहे. या प्रस्तावित इमारत बांधकामासाठी विविध करांसह सुमारे १०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. ही इमारत येत्या तीन वर्षांमध्ये बांधून तयार केली जाणार आहे.
(हेही वाचा – मुंबई बँकेच्या स्वयंपुनर्विकास योजनेसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सकारात्मक; Pravin Darekar यांची माहिती)
परळमधील केईएम रुग्णालयाच्या (KEM Hospital) आवारातील पाच बांधकामे पाडून त्यावर तळ मजला अधिक पहिला मजला ते एकवीस मजले अशाप्रकारे कर्मचारी वसाहतीची इमारत बांधली जाणार आहे. आरोग्य पायाभूत सुविधा कक्षाच्यावतीने स्थळ पाहणी केल्यानंतर या इमारत बांधकामाचा आराखडा बनवण्यात आला आहे. त्यानुसार महापालिकेने निविदा मागवल्या असून त्यामध्ये महापालिकेच्या अंदाजित दरापेक्षा उणे ११ टक्के कमी दराने बोली लावून हे काम मिळवले आहे. या कामासाठी वितराग इन्फ्रा प्रोजेक्ट एलएलपी कंपनीची निवड करण्यात आली आहे. यामध्ये विविध करांसह सुमारे १०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.
(हेही वाचा – न्यायालये विचारात घेण्यापूर्वी माध्यमांना याचिका, प्रतिज्ञापत्र प्रसिद्ध करण्यास देणे चुकीचे; Delhi High Court चा आदेश)
या इमारत बांधकामात पाणी पुरवठा आणि सांडपाण्याच्या वाहिन्यांचे काम करणे, वर्ष जलसंचयन, सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याचे काम तसेच व्यायामशाळा, धुलाई केंद्र, अग्निविरोधी कामे आदींचा समावेश आहे. या २१ मजली कर्मचारी भवनाच्या इमारतीचे भूमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १८ जानेवारी रोजी पार पडले. (KEM Hospital)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community