- प्रतिनिधी
मुंबईकरांसाठी आधारवड ठरलेल्या केईएम रुग्णालयाने (KEM Hospital) शंभर वर्षांच्या अविरत रुग्णसेवेचा टप्पा पूर्ण केला आहे. यानिमित्त आयोजित शतक महोत्सवी समारंभात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केईएम रुग्णालयाच्या रुग्णसेवेचे कौतुक करत, रुग्णालयाला “मुंबईकरांचे आधारवड” असे संबोधले.
रुग्णालयाचा गौरव व पुढील योजना :
केईएमच्या (KEM Hospital) शतक महोत्सवी समारंभात बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केईएममध्ये “आयुष्मान शताब्दी टॉवर” उभारण्याची घोषणा केली. त्यांनी असेही स्पष्ट केले की, रुग्णसेवेच्या गुणवत्तेसाठी येथे झिरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसी लागू करावी, तसेच रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी उत्तम सुविधा पुरवाव्यात. डॉक्टरांच्या कामगिरीचा इतिहास सांगणारे संग्रहालय उभारण्याची सूचनाही त्यांनी केली.
(हेही वाचा – अडीच इंचाचा चाकूचा तुकडा घुसूनही Saif Ali Khan ५ दिवसांत फिट कसा? संजय निरुपम यांचा आरोप)
रुग्णसेवेत ऐतिहासिक योगदान :
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “केईएम रुग्णालयाने (KEM Hospital) रुग्णसेवेचे व्रत अविरत चालू ठेवले आहे. इथल्या डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या अथक सेवेमुळे लाखो रुग्णांचे प्राण वाचले आहेत. भारतातील पहिली हृदय शस्त्रक्रिया (१९६८), पहिला टेस्ट ट्यूब बेबी (१९८७) यांसारख्या ऐतिहासिक घटना या रुग्णालयाने घडवल्या आहेत. तंत्रज्ञानाचा अवलंब करून, रुग्णालयाने रोबोटिक्सद्वारे गुडघ्याच्या शस्त्रक्रिया व हार्ट ट्रान्सप्लांटसारख्या अवघड प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडल्या आहेत.”
शताब्दी महोत्सवाच्या खास घटना :
समारंभात महानायक अमिताभ बच्चन यांनी उपस्थिती लावली. त्यांनी फॅटी लिव्हरवरील उपचार क्लिनिकचे उद्घाटन केले आणि यासाठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून पुढाकार घेतला. त्याबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे आभार मानले.
सेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय आणि केईएम रुग्णालयाच्या (KEM Hospital) ९९ व्या वर्धापन दिन सोहळ्याला उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासह आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार कालिदास कोळंबकर, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी स्मरणिकेचे व वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.
(हेही वाचा – छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उबाठाला खिंडार; ५० पदाधिकाऱ्यांचा BJP मध्ये प्रवेश)
केईएम : रुग्णसेवेचा दीपस्तंभ :
केईएम रुग्णालयाने (KEM Hospital) आजवर लाखो रुग्णांना आधार दिला आहे. गरीब व सामान्यांसाठी देवदूत ठरलेल्या या रुग्णालयाच्या सेवाभावाला उपमुख्यमंत्र्यांनी अभिवादन केले. “आयुष्मान शताब्दी टॉवरसारख्या योजनांमुळे केईएम भविष्यातील पिढ्यांसाठी नवीन दिशा ठरवेल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच केईएम रुग्णालयाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि रुग्णसेवेतील त्यांच्या योगदानाचा पुनःश्च गौरव केला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community