कोविड काळात पीएम केअर निधीतून खरेदी केलेल्या व्हेंटिलेटर्सचा पुरवठा महापालिकेच्या रुग्णालयांना करण्यात आला होता. परंतु यातील काही व्हेंटिलेटर्समध्ये दोष असल्याने हे व्हेंटिलेटर्स वापराविना पडून होते. मात्र, २०२१ पासून पडून असलेले हे व्हेंटिलेटर्स आता तब्बल तीन वर्षांनंतर दुरुस्ती करून वापरण्याचा विचार केईएम रुग्णालयाकडून केला जात आहे. त्यामुळे आधी भंगारात टाकायला निघालेले हे व्हेंटिलेटर्स आता दुरुस्ती करण्याचा निर्णय घेणाऱ्या रुग्णालय प्रशासनाने यापूर्वीच याची दुरुस्ती करून त्याची सेवा रुग्णांना का दिली नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. (KEM Hospital)
कोविड महामारीच्या काळात पीएम केअर निधीमधून केईएम रुग्णालयाला १२ व्हेंटिलेटर्स प्राप्त झाले होते आणि त्यातील व्हेंटिलेटर्समध्ये दोष असल्याने त्याचा वापर होऊ शकला नाही आणि काही सुस्थितीत असल्याने त्याचा वापर केला गेला. मात्र, यातील काही व्हेंटिलेटर्स हे स्पाईन ओटी आणि गॅलरीमध्ये दोन दिवसांपूर्वी दिसून आले. त्यानंतर तातडीने हे सर्व व्हेंटिलेटर्स सेव्हन हिल्स रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले. (KEM Hospital)
(हेही वाचा – Gautam Adani : गौतम अदानी एका तासात किती पैसा कमावतात ठाऊक आहे?)
मागील काही महिन्यांपासून केईएम रुग्णालयामध्ये व्हेंटिलेटर्सअभावी रुग्णांना सेवा मिळत नसून रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे व्हेंटिलेटर्सचा तुटवडा जाणवतो. त्यामुळे एका बाजूला रुग्णांसाठी व्हेंटिलेटर्सची मागणी होत असताना दुसरीकडे नवीन सिलबंद व्हेंटिलेटर्स व्हरांड्यासह मणक्याच्या शस्त्रक्रियागृहात ठेवल्याची छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झाल्याने पुन्हा हा मुद्दा चर्चेला आला आहे. (KEM Hospital)
याबाबत केईएम रुग्णालयाच्या वरिष्ठ डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, यातील काही व्हेंटिलेटर्समध्ये दोष असल्याने ते बाजूला ठेवले होते, पण आता त्याची संबंधित कंपनीच्या माध्यमातून दुरुस्ती करून घेत पुन्हा वापरात आणण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सांगितले. केईएम रुग्णालयात कोविड काळात पीएम केअर निधीतून प्राप्त झालेल्या १२ व्हेंटिलेटर्सपैकी काही व्हेंटिलेटर्समध्ये पहिल्या दिवसापासून दोष असल्याने त्यातील आठ ते नऊ व्हेंटिलेटर्स बाजूला ठेवले होते, त्यातील हे व्हेंटिलेटर्स असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. (KEM Hospital)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community