केईएम रुग्णालयात शिकाऊ परिचारिकांचे आंदोलन

परळ येथील केईएम रुग्णालयात शिकाऊ परिचारिकांनी केईएम रुग्णालय प्रशासनाविरोधात शुक्रवारी आंदोलन केले. शिकाऊ परिचारिकांना राहण्याची व्यवस्था नजीकच्या क्षयरोग रुग्णालयात केल्याने संतापलेल्या परिचारिकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. या आंदोलनानंतर परिचारिकांना इतरत्र राहण्याची व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ संगीता रावत यांनी दिले. परिचारिकांच्या या प्रश्नाबाबत पहिल्यांदा हिंदूस्थान पोस्टने याबाबत बातमी दिली होती.

काय आहे नेमकी घटना

केईएममध्ये शिकाऊ परिचारिका इमारत जीर्णावस्थेत आहे. १९२६ साली ही इमारत उभारण्यात आली. ३ नोव्हेंबर रोजी इमारतीतील छताचा काही भाग कोसळून परिचारिकांना जेवण बनवणा-या महिला कर्मचारी संगीता चव्हाण जखमी झाल्या होत्या. या घटनेनंतर महापालिकेने इमारत धोकादायक झाल्याचे जाहीर केले. केईएम रुग्णालयाने  शिकाऊ महिला परिचारिकांची सोय वडाळ्यातील क्षयरोग रुग्णालयात करण्यात आली. क्षयरोगबाधित रुग्णांच्या सानिध्यात राहिल्यास आरोग्य धोक्यात येईल, या भीतीने परिचारिकांनी व पालकांनी विरोध केला. क्षयरोग रुग्णालयात रुग्णांच्या उपचार विभागात शिकाऊ परिचारिकांना ठेवण्यात आले. ७० खाटांची व्यवस्था असलेल्या विभागात २५० परिचारिका कशा राहणार, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. केईएम प्रशासनाशी केलेल्या चर्चेनंतर अॅंकर इमारतीत तसेच अन्य ठिकाणी सुरक्षित वातावरणात ठेवले जाईल, असे आश्वासन देण्यात आल्याचे परिचारिकांच्यावतीने सांगण्यात आले.

(हेही वाचा हे घ्या पुरावे; राहुल गांधींच्या आरोपांना रणजित सावरकरांचे सडेतोड उत्तर)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here