Ban On Digital Notes, ‘या’ राज्याने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

पालकांनी मुलांच्या भविष्याची चिंता, बाल हक्क आयोगाकडे तक्रार

141
Ban On Digital Notes : कोरोना हद्दपार, तरी विद्यार्थ्यांची 'डिजीटल स्वारी' सुरुच
Ban On Digital Notes : कोरोना हद्दपार, तरी विद्यार्थ्यांची 'डिजीटल स्वारी' सुरुच

केरळमध्ये व्हॉट्सअॅप किंवा इतर सोशल मीडिया माध्यमातून विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या डिजीटल छापील नोट्सवर (Ban On Digital Notes) बंदी घातली आहे. यासंदर्भातील परिपत्रक उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे सहसंचालक सुरेश कुमार (Suresh Kumar) यांनी जारी करत निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे केरळमधील कुठल्याही शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना डिजीटल स्वरुपातील छापील नोट्स देऊ शकणार नाही. तसेच या निर्णयाचे पालन व्हावे यासाठी उपसंचालकांना वेळोवेळी शाळांना भेटी देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

(हेही वाचा : Ajmer Sharif दर्गा नव्हे महादेव मंदिर; हिंदू संघटनांची मागणी; प्रकरण पोहचले न्यायालयात)

कोविड आजारामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी घराबाहेर जाता येत नव्हते. त्यामुळे अशावेळी ऑनलाईन शिक्षणप्रणालीचा (Online education system) वापर शैक्षणिक संस्थांनी तसेच शिक्षकांनी सुरु केला. त्यावेळी विद्यार्थ्यांनाही डिजीटल स्वरुपात छापील नोट्स शिक्षकांकडून पुरवल्या जात होत्या. मात्र पूर्वीप्रमाणे शाळा सुरु होऊनही शिक्षकांकडून डिजीटल नोट्स पुरवल्या जात असल्याचे केरळमधील (Kerala) शिक्षण विभागाच्या निदर्शनात आले. त्यामुळे शिक्षण विभागाने कठोर पावले उचलत, डिजीटल स्वरुपातील नोट्सच्या वितरणावर बंदी घालण्यात आली आहे.

याप्रकरणी सर्वप्रथम काही दिवसांपूर्वी पालकांनी विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या डिजीटल स्वरुपाच्या नोट्सच्या वितरणावर चिंता व्यक्त केली होती. तसेच बाल हक्क आयोगाकडे औपचारिक तक्रारही दाखल केली होती. ज्यानंतर केरळमधील शिक्षण विभागाने (Kerala Education Department) डिजीटल स्वरुपात नोट्स देण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.