Kerala Blasts : पोलिसांना घटनास्थळी मिळाल्या ‘या’ वस्तू; टिफिन बॉक्सवर का आहे लक्ष ?

पोलिसांनी घटनास्थळावरून एक बंदुक, काडतुसे, एक बॅटरी आणि इतर आक्षेपार्ह साहित्यही जप्त केले आहे. हा बॉम्ब टिफिन बॉक्समध्ये ठेवण्यात आल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

119
Kerala Blasts : पोलिसांना घटनास्थळी मिळाल्या 'या' वस्तू; टिफिन बॉक्सवर का आहे लक्ष ?
Kerala Blasts : पोलिसांना घटनास्थळी मिळाल्या 'या' वस्तू; टिफिन बॉक्सवर का आहे लक्ष ?

केरळमध्ये रविवारी, २९ ऑक्टोबर रोजी सकाळी एकापाठोपाठ तीन स्फोट झाले. (Kerala Blasts) केरळच्या एर्नाकुलममध्ये कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या तीन स्फोटांमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर 20 हून अधिक जण जखमी झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून एक बंदुक, काडतुसे, एक बॅटरी आणि इतर आक्षेपार्ह साहित्यही जप्त केले आहे. हा बॉम्ब टिफिन बॉक्समध्ये ठेवण्यात आल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. (Kerala Blasts)

हा बॉम्ब टिफिन बॉक्समध्ये ठेवण्यात आल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. दिल्लीहून एनएसजीचे पथक घटनेच्या ठिकाणासाठी रवाना झाले आहे. या वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बोलत होते. (Kerala Blasts)

(हेही वाचा – Maratha Reservation : मराठा आरक्षण प्रश्नी राज्य सरकार कोणती भूमिका घेणार? देवेंद्र फडणवीस म्हणाले…)

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन दिल्लीहून एनएसजीचे बॉम्बशोधक पथकही केरळला पाठवण्यात आले आहे. National Security Guard च्या पथकात २ वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही समावेश आहे, जे घटनास्थळी पोहोचून या प्रकरणाची चौकशी करतील. या स्फोटानंतर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये सर्वत्र फक्त आग आणि धूर दिसत आहे. ही आग कशी लागली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी या घटनेबाबत चर्चा केली आहे.

पिनाराई विजयन सध्या दिल्लीत आहेत. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाच्या विरोधात पॅलेस्टाईन समर्थक निदर्शनांना उपस्थित राहण्यासाठी विजयन दिल्लीत होते, तेव्हा केरळमध्ये स्फोट झाला. कम्युनिस्ट पक्षाने हे आंदोलन आयोजित केले होते. केरळचे पोलीस महासंचालक डॉ. शेख दरवेश साहेब यांनी सांगितले की, आज सकाळी 9.40 च्या सुमारास ‘झमारा इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्झिबिशन सेंटर’मध्ये स्फोट झाला, ज्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि 36 जणांवर उपचार सुरू आहेत.

गुप्तचर यंत्रणांनी इस्रायल-पॅलेस्टाईनच्या संदर्भात एक महत्त्वाचा इशारा देखील जारी केला होता. भारतातील ज्यू लोकांची ठिकाणे दहशतवाद्यांचे लक्ष्य असू शकतात, असा उल्लेख करण्यात आला होता. दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने आयसिसच्या दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्याने मुंबईच्या छाबड हाऊसमधील एका महत्त्वाच्या ज्यू स्थळांची रेकीही केली होती आणि परदेशी दहशतवाद्यांना व्हिडिओ पाठवले होते. (Kerala Blasts)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.