अयोध्येत राममंदिराची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. (Ayodhya Ram Mandir) या कार्यक्रमानंतर जगभरातून कौतुक होत असतांना सेक्युलरांना मात्र पोटशूळ उठला आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन (Pinarayi Vijayan) यांनी राममंदिराच्या सोहळ्यात सहभाग घेतल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. (Kerala CM On Ram Mandir)
(हेही वाचा – Ayodhya Shri Ram Mandir उत्तर प्रदेशाला बनवणार श्रीमंत; मंदिर व्हॅटिकन आणि मक्केलाही मागे टाकणार)
घटनात्मक अधिकार्यांना केरळ सरकारचा इशारा
आता अशी वेळ आली आहे की, देशातील कोणत्याही धार्मिक स्थळाचे उद्घाटन हे राजकीय कार्यक्रमात रुपांतरित होऊ लागले आहे. आमच्या घटनात्मक अधिकार्यांना धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यापासून सावध रहाण्याचा इशारा देण्यात आला आहे. अधिकाऱ्यांच्या अशा सहभागामुळे धर्मनिरपेक्ष राज्य (secular state) म्हणून आमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण होईल, असे विजयन यांनी म्हटले आहे.
जवाहरलाल नेहरूंचे दिले दाखले
देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू (Prime Minister Jawaharlal Nehru) यांच्या धर्मनिरपेक्षतेचे दाखले या वेळी विजयन यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री पिनाराई विजयन पुढे म्हणाले की, ”नेहरू अनेकदा म्हणायचे की, भारतीय धर्मनिरपेक्षता म्हणजे धर्म आणि सरकार वेगळे ठेवणे. ते वेगळेपण जपण्याची आपल्याकडे एक परंपरा आहे. मात्र, धर्म आणि सरकार यांच्यातील सीमारेषा अधिक पुसट होत आहे. त्यामुळे ज्यांनी भारतीय राज्यघटनेची शपथ घेतली आहे, त्यांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की, देशातील प्रत्येक व्यक्तीला त्याच्या धर्माचे पालन करण्याचा समान अधिकार आहे.”
राममंदिराच्या प्रकरणी सरकारवर टीका करणारे पिनराई विजयन यांनी यापूर्वी गोमांसभक्षणाचे मात्र उघड उघड समर्थन केले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community