वायनाड लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघात राहुल गांधी (Rahul Gandhi) खासदार आहेत. त्याच बालेकिल्ल्यात आता वक्फ बोर्डाचे (Waqf board) वर्चस्व पाहायला मिळत आहे. वायनाडमधील तळपुझा या गावातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनींवर वक्फ बोर्डाने (Waqf board) दावा केला आहे. वक्फच्या दाव्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या कुटुंबियांमध्ये एकूणच भीतीचे वातावरण पसरले आहे.
( हेही वाचा : Border-Gavaskar Trophy 2024 : पर्थमध्ये कसं आहे हवामान? पावसाची शक्यता किती?)
वायनाडमधील शेतजमिनीमुळे शेतकरी कुटुंबियांचे गुजराण होत होती. मात्र अचानक वक्फ बोर्डाने (Waqf board) जमिनीवर दावा केल्याने शेतकरी कुटुंबात भीतीचे वातावरण आहे. जमिनींची सगळी कागद पत्रं, सगळे दाखले असताना सुद्धा ही जमीन वक्फ बोर्डाच्या ताब्यात जाणार असल्याने एकूणच चिंतेचं वातावरण पसरले आहे. दावा करण्यात आलेल्या जमिनीवर ७ घरं आणि १० दुकानं आहेत. त्यावरच शेतकरी कुटुंबाची उपजिवीका चालते. ही जमीन शेतकरी कुटुंबाची असून थाविन्हल पंचायतीच्या रेकॉर्डवरून असे दिसून येते की वादग्रस्त जमिनीवरील किमान एका इमारतीचे कागदपत्र १९४८ च्या पूर्वीचे आहेत.(Waqf board)
दरम्यान या प्रकरणी भाजपा नेत्या नाव्या हरिदास (Navya Haridas) यांनी दखल घेऊन पीडित कुटुंबियांची भेट घेतली. तसेच हरिदास यांनी वक्फ बोर्डाला खाजगी जमीन ताब्यात घेण्यापासून रोखण्याचा निर्धार केला आहे. त्याचबरोबर स्थानिकांनी मुख्यमंत्री पिनाराई विजयन आणि मंत्री ओआर केलू यांना निवेदन सादर करत कृती परिषद स्थापन केली आहे. आपल्या मालमत्तेचे हक्क सुरक्षित करण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणी इथले रहिवासी करत आहेत.(Waqf board)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community