केरळ मिनी पाकिस्तान आहे; म्हणून राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा निवडून येतात; Nitesh Rane यांचे थेट विधान

127
केरळ मिनी पाकिस्तान आहे; म्हणून राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा निवडून येतात; Nitesh Rane यांचे थेट विधान
केरळ मिनी पाकिस्तान आहे; म्हणून राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा निवडून येतात; Nitesh Rane यांचे थेट विधान

आमचे केरळवरून (Kerala) जे मित्र आले आहेत, त्यांच खरंच कौतुक करायला पाहिजे. त्यांनी 12 हजार मुलींना सोडवलं. आपल्या एका भगिनीला घरी आणण्यासाठी किती मेहनत करावी लागते ते आमच्यासारख्या हिंदुत्त्ववादी कार्यकर्त्यांना विचारा. पण या केरळमधल्या भावाने 12 हजार हिंदू भगिनींचं आयुष्य वाचवलं. केरळसारख्या राज्यात त्यांनी हे काम करून दाखवलंय. केरळ हे राज्य मिनी पाकिस्तान (mini Pakistan) आहे. म्हणूनच राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि त्यांची बहीण (Priyanka Vadra) तेथून निवडून येतात. सगळे अतिरेकीच त्यांना मतदान करत आहेत. मी खरं बोलतोय. अतिरेक्यांना हाताशी धरूनच हे लोक खासदार झालेले आहेत, अशी खरमरीत टीका मंत्री नीतेश राणे (Nitesh Rane) यांनी केली आहे.

(हेही वाचा – २०२७ मध्ये Nashik आणि Trimbakeshwar मध्ये होणार सिंहस्थ कुंभमेळा; ‘असे’ आहे नियोजन)

ते पुण्यातील सासवड येथे शिवप्रताप दिन अफजलखानाचा वधाच्या स्मृती कार्यक्रमात बोलत होते.

नीतेश राणे पुढे म्हणाले की, आमच्या मिरवणुका जर दहा वाजेपर्यंत चालत असतील, तर मोहर्रमच्या आणि ईदच्या मिरवणुकादेखील दहा वाजेपर्यंत चालल्या पाहिजेत. आपण बोलणारे कमी आणि कार्यक्रम करणारे जास्त आहोत. तुमच्या हक्काचा माणूस सरकारमध्ये बसलाय फक्त एक फोन करा. बेकायदेशीर माणसाला कसं थरथर कापावे लागते ते कळेल, असा इशाराही मंत्री नीतेश राणे (Nitesh Rane) यांनी दिला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.