सध्या आपल्याला कुठल्याही अनोळखी ठिकाणी जायचे असल्यास आपण लगेचच गुगल मॅप वर डोळे झाकून विश्वास ठेवतो. मात्र यावर अवलंबुन राहणे दोन डॉक्टराना चांगलेच महागात पडले असून त्यांचा जीव गेला आहे. अशी घटना केरळ मधील कोच्ची येथे ही घटना घडली आहे. गुगल मॅपमुळे (Google Map) रस्ता चुकल्याने नदीत बुडून कारचा अपघात झाला. या अपघातात डॉ. अद्वैत आणि डॉ. अजमल या दोन डॉक्टरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर, तीन जण जखमीही झाले आहेत.
कोच्चीजवळील (Kocchi) गोथुरुथ येथील पेरियार नदी मध्ये कार बुडाली आणि अपघात झाला. या अपघातात कारमधील दोन डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. ही घटना घडली तेव्हा मुसळधार पाऊस सुरु होता आणि यावेळी कारचालक गूगल मॅपचा वापर करत होता. जोरदार पावसामुळे (Heavy Rain) कारचालकाला समोरचं काही दिसत नव्हतं. यानंतर तो गुगल मॅपने दाखवलेल्या मार्गाने पुढे गाडी चालवत राहिला आणि यावेळी कार थेट नदीत बुडून अपघात घडला.
(हेही वाचा : Nashik : मिरवणुकीत गेले आणि डोळे भाजून आले, नाशिक मध्ये नेमके काय घडले)
शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारात ही घटना घडल्याची माहिती आहे. या अपघातात डॉ. अद्वैत (29 वर्ष) आणि डॉ. अजमल (29 वर्ष) चा मृत्यू झाला आहे. हे दोघेही खासगी रुग्णालयात होते. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, डॉ. अद्वैत गाडी चालवत होते आणि गुगप मॅपचा वापर करत होते. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, गोथुरुथमध्ये जोरदार पाऊस झाला, त्यामुळे दृश्यमानताही खूपच कमी होती. गाडी चालवणारा तरुण गुगल मॅपने दाखवलेल्या मार्गावरून जात होता. त्याला कार डाव्या वळणावर वळवायची होती, मात्र तो चुकून पुढे गेला आणि गाडी नदीत कोसळली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community