वैद्यकीय तपासणीसाठी तिरुअनंतपूरमच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आलेली एक व्यक्ती तब्बल दोन दिवस लिफ्टमध्ये अडकून पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरडाओरड करूनही कोणीही सोडवायला आले नाही. सोमवारी लिफ्टमन नेहमीप्रमाणे ड्युटीवर आल्यावर लिफ्ट बंद पडल्याचे समजल्यावर दुरुस्तीनंतर त्याची सुटका झाली. सोमवारी (15 जुलै) सकाळपर्यंत लिफ्टचे कामकाज पाहणाऱ्या अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती नव्हती. यानंतर अधिकाऱ्यांनी कथित हलगर्जीपणासाठी ऑपरेटर्सवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे.
(हेही वाचा – शानदार खेळीने कारकीर्द गाजवणारे माजी हॉकी खेळाडू आणि भारताचे कर्णधार Dhanraj Pillay)
दरम्यान, राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून या प्रकरणाचा अहवाल मागवला आहे. याशिवाय, आरोग्य विभागाने या घटनेसंदर्भात दोन लिफ्ट ऑपरेटर आणि एक ड्युटी सार्जंट अशा तीन कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.
सोमवारी सकाळी उघड झाला प्रकार
केरळ विधानभवनातील 59 वर्षीय कर्मचारी रविंद्रन नायर यांच्याबाबतीत ही घटना घडली. ते शनिवारी सायंकाळी चेकअपसाठी रुग्णालयात आले. दुसर्या मजल्यावर जाण्यासाठी ते लिफ्टमध्ये शिरले. ते एकटेच होते. ही लिफ्ट पहिल्या आणि दुसर्या मजल्याच्या मध्येच अचानक बंद पडली. नायर घाबरून गेले. आरडाओरडा करू लागले. मोबाईल लावण्यासाठी खिशातून मोबाईल काढला तर तोही खाली पडून बंद पडला. लिफ्टमधील अलार्म आणि इमर्जन्सी क्रमांकही चालू नव्हते.
सोमवारी सकाळी या लिफ्टचा लिफ्टमन ड्युटीला आला तेव्हा लिफ्ट अडकल्याचे लक्षात आले. त्याने दुरुस्ती करणार्यांना कळवल्यावर पथक आले. त्या वेळी दार उघडल्यावर त्यांना नायर आत पडलेले दिसले.
या काळात लघवीसाठीही कोणतीच सोय नव्हती, पिण्याचे पाणीही नव्हते, असे नायर यांनी सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community