Kerala मध्ये मुसलमानांच्या लोकसंख्येत हिंदूंपेक्षा पाचपटीने वाढ

210

केरळमध्ये (Kerala) हिंदूंच्या लोकसंख्येपेक्षा (Hindu population) मुसलमानांची लोकसंख्या (Muslim population) अर्धी आहे; मात्र मुसलमानांचे मुले जन्माला घालण्याचे प्रमाण अधिक आहे. ‘सेंटर फॉर पॉलिसी स्टडीज’च्या (Center for Policy Studies) अहवालात काही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. ‘भारतातील धार्मिक लोकसंख्याशास्त्र : वाढता धार्मिक असमतोल’, असे या अहवालाचे नाव आहे. या अहवालात वर्ष २००८ ते २०२१ पर्यंत केरळमधील हिंदु, मुसलमान, ख्रिस्ती आणि इतर यांच्या आकडेवारीवर संशोधन करण्यात आले आहे.

केरळमध्ये जन्माला येणारी सुमारे ४४ टक्के मुले मुसलमान आहेत. दुसरीकडे मुसलमानांमध्ये मृत्यूची संख्या त्यांच्या लोकसंख्येच्या तुलनेत खूपच अल्प आहे. यामुळे दरवर्षी हिंदूंच्या तुलनेत मुसलमानांच्या लोकसंख्येत वाढ होत आहे. मुसलमानांची वाढ हिंदूंपेक्षा ५ पटींनी अधिक आहे.

अहवालात म्हटले आहे की, वर्ष २०१६ पासून केरळमधील मुसलमानांमध्ये सर्वाधिक मुले जन्माला येत आहेत. वर्ष २०१६ मध्ये केरळमध्ये २ लाख ७ हजार हिंदु मुले जन्माला आली, तर याच काळात २ लाख ११ हजार मुसलमान मुले जन्माला आली. वर्ष २०१७ मध्येही अशीच परिस्थिती होती. तेव्हा २ लाख १० हजार ७१ हिंदु मुले जन्माला आली होती, तर मुसलमानांची २ लाख १६ हजार ५२५ मुले जन्माला आली होती. वर्ष २०२० पर्यंत असेच चालू राहिले. केवळ वर्ष २०२१ हे हिंदु मुलांची संख्या वाढण्याचे वर्ष होते.

राज्यात हिंदु लोकसंख्या सुमारे ५५ टक्के अणि मुसलमान लोकसंख्या अंदाजे २७ टक्के असतांना हे घडत आहे. वर्ष २००८ मध्ये केरळमध्ये जन्मलेल्या मुलांमध्ये ४५ टक्के हिंदु होते, तर ३६ टक्के मुसलमान होते.

वर्ष १९५० पासून केरळमध्ये मुसलमानांची लोकसंख्या सर्वांत वेगाने वाढत आहे. केरळच्या (Kerala) लोकसंख्येत प्रतिवर्षी १ लाखहून अधिक मुसलमानांची भर पडत आहे, तर हिंदूंची लोकसंख्या केवळ १ हजार ९९ ने वाढली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.