ग्राहकांच्या जीवाशी होतोय खेळ; राॅकलेच्या नावावर ‘थीनर’चा बाजार

2016 मध्ये मुंबईत राॅकेल विक्री बंद करण्यात आली. सरकारकडून होणारा राॅकेलचा पुरवठा बंद झाला आहे, असे असले तरी कित्येक रेशन दुकानांत सर्रास राॅकेलची विक्री होताना दिसते. परंतु, हे राॅकेल नसून थीनर सदृश्य द्रवपदार्थ आहे. सरकारकडून होणारा राॅकेलचा पुरवठा बंद झाल्यामुळे थीनर विकून ग्राहकांची दिशाभूल केली जात आहे.

या भागांत होतेय विक्री

प्रामुख्याने गोवंडी, चेंबूर, मानखुर्द, मालाड, कांदिवली, धारावी आणि साकीनाक्यातील झोपडपट्ट्यांमधील काही रेशन दुकानांत थीनरची विक्री केली जात आहे. राॅकलेच्या नावाखाली या भागांमध्ये 70 ते 80 रुपयांना विकला जाणार हा द्रवपदार्थ पांढरा आणि काहीसा पिवळसर रंगाचा असतो.

मुंबई विभाग हा राॅकेलमुक्त करण्यात आला आहे. त्यामुळे राॅकलेच्या नावाखाली अन्य पदार्थच काय, राॅकलेही विकण्यास परवानगी नाही, असे काही प्रकार होत असतील तर तपास केला जाईल, असे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव विजय वाघमारे यांनी म्हटले आहे. 

( हेही वाचा: लाऊड स्पीकर विक्रीवर आता कडक पहारा; खरेदीदाराची नोंद करण्याचे निर्देश )

स्फोट होण्याची भीती 

राॅकेल हे फिल्टर होऊन येत असल्याने, स्टोव्हमध्ये भरल्यानंतर त्याचा अपाय होत नाही. याउलट थीनर हे जडपातळ स्वरुपात असते. प्रामुख्याने रंगात मिसळण्यासाठी ते तयार केले जाते. राॅकेल समजून स्टोव्हमध्ये भरल्यानंतर बर्नरमध्ये अडकून त्याचा स्फोट होऊ शकतो. त्यामुळे याकडे सरकारने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here