मंचर येथील ‘लव्ह जिहाद’ (Keshav Upadhyay) घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची भूमिका धर्माच्या आधारावर ठरते का,असा परखड सवाल भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhyay) यांनी शुक्रवारी (२ जून) प्रदेश कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केला. यावेळी महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष वर्षा भोसले, मुंबई भाजपा उपाध्यक्ष अमरजीत मिश्र आदी उपस्थित होते. राजकारणाच्या पलिकडे जाऊन या घटनेचा निषेध करण्याची भूमिका घेण्याचे धाडस राष्ट्रवादी कॉंग्रेसने आता तरी दाखवावे,असे आव्हानही उपाध्ये यांनी कोणाचे नाव न घेता दिले.
उपाध्ये (Keshav Upadhyay) म्हणाले की, पुणे जिल्ह्यातील मंचर येथील ‘लव्ह जिहाद’ च्या घटनेला आठवडाभरापूर्वी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी वाचा फोडली. ‘लव्ह जिहाद’ ची घटना उघड होऊन सात आठ दिवस लोटले तरी ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायद्याला विरोध करणा-या राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि त्यांच्या नेत्यांनी याबाबत चकार शब्द काढला नाही. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी त्यांच्याच तालुक्यातील तरुणीसोबत हा प्रकार घडून सुद्धा ब्र देखील काढला नाही.राज्यात ‘लव्ह जिहाद’ वगैरे काही घडत नाही, असं ठासून सांगणाऱ्या खा.सुप्रिया सुळे यांनीही या घटनेबाबत प्रतिक्रीया व्यक्त केलेली नाही. मात्र, हाथरस तसेच इतर महिला अत्याचाराच्या घटनांबाबत तातडीने व्यक्त होणा-या सुप्रिया ताई यांनी या घटनेबाबत मात्र मौन पाळले आहे. आता तरी त्यांनी मौन सोडून ठाम भूमिका मांडावी अशी मागणीही उपाध्ये यांनी केली.
(हेही वाचा – Bulldozer Pattern : महाराष्ट्रात ‘बुलडोझर पॅटर्न’; बांगलादेशी घुसखोरांची अनधिकृत बांधकामे राज्य सरकारने पाडली)
मंचर च्या घटनेत अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवण्यात आले. तिचे लैंगिक शोषण करण्यात आले. बळजबरीने गोमांस खायला लावले गेले,बुरखा घालण्याची सक्ती केली गेली. हे लव्ह जिहाद नाही तर काय आहे ? हिंदू समाज एकवटून लव्ह जिहाद विरोधी मोर्चे काढत असताना याच सुप्रियाताईंनी मोर्चाची खिल्ली उडवली होती याची आठवणही उपाध्ये (Keshav Upadhyay) यांनी करून दिली.
हेही पहा –
राज्याचे माजी गृहमंत्री असलेल्या वळसे पाटील यांनी पीडित मुलीची व तिच्या कुटुंबीयांची भेट घेण्याचे सौजन्यही दाखविले नाही. मंचर सारख्या लव्ह जिहाद च्या घटनांकडे राजकीय फायद्या तोट्याची गणिते बाजूला ठेवून पहायला हवे, असेही उपाध्ये (Keshav Upadhyay) यांनी यावेळी नमूद केले.
Join Our WhatsApp Community