‘मेरा अब्दुल ऐसा नही…’ पोस्टवर केतकी चितळेचे प्रत्युत्तर, सोशल मीडियात पोस्ट व्हायरल

आफताबने हिंदू युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला ठार करून तिच्या शरीराचे ३५ तुकडे केले. यानंतर देशभरात खळबळ उडाली. हा लव्ह जिहादचा प्रकार असून देशभरातील हिंदू युवतींनी जागरूक झाले पाहिजे, असा मतप्रवाह निर्माण झाला आहे. त्यातच ‘मेरा अब्दुल ऐसा नही…’ अशी धक्कादायक पोस्ट मुसलमान तरुणांच्या समर्थनार्थ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. त्यावर आता अभिनेत्री केतकी चितळे यांनी त्यावर प्रतिवाद करणारी पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

सहा महिन्यापूर्वीच आफताबने श्रद्धाचा जीव घेतला होता, मात्र त्याचे हे कृत्य आता उघडकीस आले. चित्रपटातील आणि वेबसीरीजमधील सीन पाहून त्याने हा खून केल्याचे उघड झाले. आता या प्रकरणावर संपूर्ण देशातून तीव्र प्रतिसाद उमटत आहेत. अभिनेत्री केतकी चितळे हिने देखील या प्रकरणी पोस्ट करत आपले परखड मत मांडले. आणखी किती श्रद्धा अशा बळी जाणार आहेत, असा प्रश्न तिने तिच्या पोस्टमधून विचारला आहे.

(हेही वाचा कोणताही उद्योग राज्याबाहेर १-२ महिन्यात जात नाहीत, ती काय जादूची कांडी आहे का? – मुख्यमंत्र्यांचा घणाघात)

केतकीचा हिंदू मुलींना सवाल

सध्या हे प्रकरण सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. प्रत्येकजण याविषयावर आपले मत मांडत आहे. अशातच केतकीने पोस्ट करत आपला राग व्यक्त केला आहे. केतकीने फेसबुकवर एक पोस्ट करत लिहिले, ‘मेरा अब्दुल ऐसा नहीं बरोबर आहे. कारण आप मेलं, जग बुडालं. पण ३५ तुकडे होताना, गळा दाबला जाताना तरी कुठे तरी पश्चात्ताप होत असेल ना? कुटुंबियांची आता काय मानसिक स्थिती असेल याचा तर विचार केल्यास अंगावर काटा येतो. मुलींनो, तुम्ही शेवटचा श्वास घेताना डोळे उघडून पुन्हा (या वेळी कायमचे) मिटणार आहात? का आता तरी निद्रा मोडणार आहात?’ असे लिहित तिने ‘जागो_मेरे_देश’ असा हॅशटॅगही वापरला आहे. ही पोस्ट करत केतकीने जणू मुलींनाच प्रश्न विचारले आहेत. प्रत्येक वेळी प्रेमात पडून आंधळा विश्वास ठेऊन स्वतःचाच बळी देणार आहात का? आता तरी झोपेतून जाग्या होणार आहात का?, असे केतकी चितळे म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here