London मध्ये खलिस्तानी समर्थक आणि भारतीय आले समोरासमोर; भारतीयांनी दिले चोख प्रत्युत्तर, Video viral

75

भारत यावर्षी २६ जानेवारी २०२५ रोजी ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना. ब्रिटनची (Britain) राजधानी लंडन येथे खलिस्तानी समर्थक (Pro-Khalistani) आणि भारतीय समोरासमोर आले आहेत. लंडन येथे प्रजासत्ताक दिनी (Republic Day) भारत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करणाऱ्या खलिस्तानी समर्थकांना भारतीय समुदायाकडून चोख प्रत्युत्तर दिले आहे. तसेच यावेळी लंडनमधील भारतीय समुदायाच्या लोकांनी एकजूट दाखवत तिरंगा फडकवत खलिस्तानी समर्थकांना प्रत्युत्तर दिले. या संबंधित समाज मध्यामांवर व्हिडिओ वायरल होत आहेत. यापूर्वी कॅनडामध्ये देखील असाच प्रकार समोर आला होता. काही दिवसांपूर्वी बॉलिवूड चित्रपट इमर्जन्सीविरोधात देखील खलिस्तानी समर्थकांनी चित्रपटगृहात घुसून धुमाकूळ घातल्याच्या घटना घडल्या आहेत. (London)

दरम्यान प्रजासत्ताक दिन साजरा केला जात असताना खलिस्तानी समर्थकांनी भारतीय दूतावासाबाहेर (Indian Embassy) एकत्र गोळा होत, भारत सरकारविरोधात आंदोलन केलं. यावेळी खलिस्तानी समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच त्यांनी भारत सरकारच्या धोरणांवर टिका केली, यावेळी पंजाबमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करत अल्पसंख्यांक समुदायांना वाईट वागणूक दिली जात असल्याचा आरोप खलिस्तानी समर्थकांनी केली.

(हेही वाचा – Donald Trump यांचा बांगलादेशला मोठा झटका ; सबसिडी आणि करार तात्काळ बंद)

यानंतर भारतीय समर्थकांनी भारतीय तिरंगा फडकवत तसेच ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम’ सारख्या देशभक्तीपर घोषणा देत खलिस्तानी समर्थकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. या दोन्ही गटांना वेगळे ठेवण्यासाठी, तसेच कोणत्याही प्रकारच्या हिंसाचार घडू नये.  म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.