खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूच्या धमकीनंतर दिल्ली आणि पंजाब विमानतळांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी (BCAS) ने दिल्ली आणि पंजाब विमानतळांवर प्रवाशांना प्रवेश पास देण्यास बंदी घातली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती पावले उचलली जात आहेत. या अंतर्गत दिल्ली आणि पंजाब येथून एअर इंडियाच्या विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची दोनदा तपासणी केली जात आहे. (Security on Air Port)
विमानतळ प्राधिकरणाला ६ नोव्हेंबरला अभ्यागतांच्या संदर्भात ही सूचना देण्यात आली होती. याशिवाय प्रवाशांचे सामानही बारकाईने तपासले जाणार आहे. प्रवाशांच्या बॅगा आणि सामानाची कडक तपासणी केली जात आहे. दिल्ली आणि पंजाब विमानतळांवर हे प्रक्रिया सुरू झाली आहे.दिल्ली आणि पंजाब विमानतळांवरून एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची कसून तपासणी केली जात आहे. खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने एअर इंडियाच्या विमानात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी दिली आहे. या धोक्यामुळे खबरदारी म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे.विमान वाहतूक सुरक्षा नियामकाने सांगितले की, भारतातील विमानतळ, हवाई पट्टी, एअरफील्ड, एअरफोर्स स्टेशन, हेलिपॅड, फ्लाइट स्कूल आणि विमान वाहतूक प्रशिक्षण शाळांसारख्या नागरी विमान वाहतूक आस्थापनांना धोका लक्षात घेऊन ही पावले उचलण्यात आली आहेत. भारताने कॅनडाला सुरक्षा वाढवण्यास सांगितले असून पन्नूवर कारवाई करण्याची मागणीही केली आहे.
(हेही वाचा : ATS Karvai : अलिगढमधून ISIS च्या दोन दहशतवाद्यांना पकडले, ‘हा’ होता त्यांचा डाव)
Join Our WhatsApp Community