Canada मधील भारतीय दुतावासाबाहेर खलिस्तानवाद्यांनी जाळला भारतीय राष्ट्रध्वज

लष्करी कारवाईचे पोस्टर या वेळी झळकवण्यात आले. खलिस्तान चळवळीचे समर्थन करणाऱ्या 'शीख फॉर जस्टिस' (Sikhs for Justice, एस.एफ.जे.) या फुटीरतावादी संघटनेने हे आंदोलन केले.

196
Canada मधील भारतीय दुतावासाबाहेर खलिस्तानवाद्यांनी जाळला भारतीय राष्ट्रध्वज
Canada मधील भारतीय दुतावासाबाहेर खलिस्तानवाद्यांनी जाळला भारतीय राष्ट्रध्वज

व्हँकुव्हरमधील भारतीय दूतावासाबाहेर गुरुवार, ७ जून रोजी खलिस्तानवाद्यांनी भारतीय राष्ट्रध्वज जाळला. याचबरोबर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येविषयीचे पोस्टर्सही झळकवण्यात आले. ऑपरेशन ब्लूस्टारला 40 वर्षे पूर्ण झाली. त्या कारणाने खलिस्तानवाद्यांनी (Khalistani terrorists) भारतियांच्या अस्मिता दुखावण्याचा प्रयत्न केला.

(हेही वाचा – शपथविधीनंतर पाहू; Amit Shah आणि Devendra Fadnavis यांच्या चर्चेत काय झाले ?)

1984 मध्ये अमृतसरमधील सुवर्ण मंदिरातून भिंद्रनवाले यांच्यासह खलिस्तानी अतिरेक्यांना हटविण्याच्या उद्देशाने ऑपरेशन ब्लूस्टार (Operation Bluestar) करण्यात आले होते. या लष्करी कारवाईचे पोस्टर या वेळी झळकवण्यात आले. खलिस्तान चळवळीचे समर्थन करणाऱ्या ‘शीख फॉर जस्टिस’ (Sikhs for Justice, एस.एफ.जे.) या फुटीरतावादी संघटनेने हे आंदोलन केले.

गुरपतवंत पन्नूने यापूर्वीही दिली होती धमकी

टोरंटो येथील वाणिज्य दूतावासातही अशाच प्रकारे खलिस्तानवाद्यांच्या कारवाया चालू होत्या. गेल्या वर्षी ब्रिटिश कोलंबियामध्येही खलिस्तान समर्थकाच्या हत्येचा हवाला देत एस.एफ.जे.चा Gurpatwant Pannu याने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी दिली होती.

यापूर्वी भारत सरकारने अशा खलिस्तानी कारवायांवर तीव्र निषेध नोंदवला आहे. आताही कॅनडा सरकारला खडसावण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.