Khar Gymkhana कडून सुप्रसिद्ध महिला क्रिकेटरचं सदस्यत्व रद्द, वडिलांवर धर्मांतराचे आरोप!

74

भारतीय महिला क्रिकेटर जेमिमा रॉड्रिग्ज हिच्यावर मुंबईतील सर्वात जुन्या खार जिमखाना (Khar Gymkhana) क्लबने कारवाई केली आहे. ही कारवाई जेमिमा रॉड्रिग्ज (Jemimah Rodrigues) हिच्या वडीलांमुळे झाल्याचे बोलले जात आहे. जेमिमाच्या वडिलांवर तिच्या सदस्यत्वाचा वापर हा धार्मिक कृत्यासाठी केल्याचा आरोप खार जिमखान्याच्या (Khar Gymkhana) अधिकाऱ्यांनी केलेला आहे. त्यात जेमिमा रॉड्रिग्जचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. २०१५ चा हा व्हिडिओ असून ख्रिश्चन धर्मिय कार्यक्रमात ती सहभागी झाल्याचे दिसते.

( हेही वाचा : Vivah Muhurat : नोव्हेंबरपासून उडणार लग्नाचा बार; आठ महिन्यांत लग्नाचे ५२ मुहूर्त !

या व्हिडिओत दाखवण्यात आले आहे की, कमी वयातील जेमिमा रॉड्रिग्ज (Jemimah Rodrigues) एका ख्रिश्चन धर्मियांच्या कार्यक्रमाला संबोधित करत आहे. ती ३७ चेंडूमध्ये २५ नाबाद धावा केल्याबद्दल येशूचे आभार मानते. तसेच सूत्रसंचालक जसा स्टेजवर येतो तसे भूत अंगात आल्यासारखे ती अभिनय करत जमिनीवर पडते. दरम्यान अशाच ख्रिस्ती मिशनऱ्यांकडून होणाऱ्या धर्मांतराच्या कार्यक्रमात जेमिमा रॉड्रिग्ज (Jemimah Rodrigues) हिचे वडील संबोधित करत असल्याची माहिती काही वृत्तसंस्थांनी दिली आहे.

दरम्यान जेमिमा रॉड्रिग्ज (Jemimah Rodrigues) ही मागील अनेक वर्षांपासून खार जिमखाना क्लबची सदस्य आहे. खार जिमखान्यांच्या (Khar Gymkhana)अधिकाऱ्यांनी सांगितले की, जेमिमाचे वडील क्लब (Khar Gymkhana) परिसराचा वापरत धार्मिक कार्यासाठी करत होते. त्यामुळेच जिमखान्याच्या (Khar Gymkhana) वार्षिक सर्वसाधारण सभेत हा क्लबचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात जेमिमा रॉड्रिग्ज (Jemimah Rodrigues) हिचे तीन वर्षाचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. तसेच तिच्या वडीलांवर ‘ब्रदर मॅन्युएल मिनिस्ट्रीज’ या धर्मांतराला पाठबळ देणाऱ्या संस्थेशी संबंधित असल्याचा ही आरोप आहे.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.