खारदांडा स्मशानभूमी पुढील काही दिवस राहणार बंद

खारदांडा स्मशानभूमी दुरुस्ती कामासाठी १० ऑगस्ट २०२२ पासून तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात येत असून पर्यायी व्यवस्था सांताक्रूझ स्मशानभूमी येथे उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती महानगरपालिकेच्या ‘एच पश्चिम’ विभागाने दिली आहे.

अंत्यसंस्काराकरीता पर्यायी व्यवस्था  ‘एच पश्चिम’ विभागात

दु:खदायक परंतु चिरंतन सत्‍य असणा-या मृत्‍युनंतर मृतदेहावर अंतिम संस्‍कार करण्‍याची सुविधा करुन देण्‍याच्‍या उद्देशाने  महानगरपालिकेद्वारे विविध ठिकाणी पारंपरिक स्‍मशानभूमींसह विद्युत वा गॅस दाहिनी असणा-या स्‍मशानभूमी आहेत. यापैकीच एक असणा-या ‘एच पश्चिम’ विभागातील खारदांडा स्मशानभूमीचे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे ही स्मशानभूमी बुधवार, १० ऑगस्ट २०२२ पासून देखभाल व इतर दुरुस्‍तीच्‍या कामाकरीता तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्‍यात येणार आहे. अंत्यसंस्काराकरीता पर्यायी व्यवस्था म्हणून ‘एच पश्चिम’ विभागातीलच सांताक्रूझ येथील स्मशानभूमी उपलब्ध असेल. त्यामुळे नागरिकांनी अंत्यसंस्कार करता खारदांडा स्मशानभूमीत दुरुस्तीचे काम होईपर्यंत जाणे टाळावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here