राज्यामध्ये खरीप पेरणी ‘इतक्या’ टक्क्यांनी कमी; गहू, कडधान्ये, तेलासह डाळीही महागणार

258
राज्यामध्ये खरीप पेरणी 'इतक्या' टक्क्यांनी कमी; गहू, कडधान्ये, तेलासह डाळीही महागणार
राज्यामध्ये खरीप पेरणी 'इतक्या' टक्क्यांनी कमी; गहू, कडधान्ये, तेलासह डाळीही महागणार

देशात जुलैअखेर सरासरीपेक्षा फक्त ५ तर राज्यात १३ टक्के अधिक पाऊस झाला आहे. तर, काही जिल्ह्यांत उद्याप पावसाने हवी तशी सरासरी न गाठल्याने खरीप पेरण्यांना चांगलाच फटका बसला आहे. राज्यात जुलैअखेर ८ टक्के कमी म्हणजे ९२ टक्के पेरण्या झाल्या असल्यामुळे तूर, उडीद, मूग, गहू, भुईमूग व सूर्यफुलाचे क्षेत्र कमी असल्याने रवा, गहू, शेंगदाणे, डाळी व तेलाच्या महागाईला भविष्यात सामोरे जावे लागण्याची चिन्हे दिसत आहेत. तर, जास्त क्षेत्रामुळे सोयाबीन व कापसाचे दरही घसरण्याची चिन्हे आहेत.

किराणा दर आणखी वाढण्याची चिन्हे

सद्धा तूरडाळ, गहू, रवा, शेंगदाण्यांच्या दरात वाढ झाली आहे. भुईमुगासह कडधान्य लागवड पुरेशी नसल्याने डाळींसह शेंगदाणे, तेलाच्या दरात वाढ होण्याची चिन्हे आहेत. असे नाशिक रोड घाऊक किराणा विक्रेते सुरेश शेटे म्हणाले.

(हेही वाचा – Talibani : संगीताने मुले भरकटतात, असे म्हणत तालिबान्यांनी संगीत वाद्ये जाळली)

पावसात खंड पडल्यास नुकसान

कृषी सहसंचालक मोहन वाघ म्हणतात, जूनमध्ये पुरेसा पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांनी मका, सोयाबीन, कापूस आणि तुरीच्या पेरण्यांना पसंती दर्शवली. आगामी काळात पावसामध्ये खंड पडल्यास पिकांच्या उत्पादनावरही परिणाम होऊ शकतो.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.