३० सप्टेंबर २०२४ रोजी किल्लारीच्या महाप्रलयंकारी भूकंपाला ३१ वर्षे पूर्ण झाली. आजही ‘किल्लारी’च्या आठवणी जाग्या आहेत. या कालावधीत मराठवाड्याने भूगर्भातील किती हालचाली नोंदवल्या, त्याचा धावता आढावा.. (Killari Earthquake 1993)
(हेही वाचा – First Women MIDC: उद्योगमंत्र्यांची मोठी घोषणा! नागपुरात महिलांसाठी एमआयडीसी)
सप्टेंबर १९९३ ते सप्टेंबर २०२४ या काळात लातूर परिसराला भूकंपाचे ४८ धक्के बसले. १९९९ मध्ये किल्लारीला ११ धक्के जाणवले. लातूर, धाराशिव, किल्लारी, लोहारा, उमगरा, सास्तूर-माकणीला सर्वाधिक धक्के बसले. १३ सप्टेंबर २०२८ रोजी ३.९ रिश्टर, २१ डिसेंबर २०२१ रोजी ३.९ आणि २.७ रिश्टरचे धक्के बसले, तर ७ ते २३ सप्टेंबर २०२२ मध्ये तीन सौम्य धक्के जाणवले. लातूर जिल्ह्याला २०२२ मध्ये भूकंपाचे ११ धक्के ऑक्टोबर २०२३ मध्ये भूकंपाचे चार धक्के बसले.
सन २०१८ ते २०२४ या सहा वर्षांच्या काळात मराठवाड्यातील काही गावांमध्ये भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाण वाढले आहे. काही गावांना सौम्य धक्के जाणवले आहेत. २०२४ मध्ये भूकंपाची एकही नोंद झाली नाही. (Killari Earthquake 1993)
हेही पहा –