Killari Earthquake : किल्लारी कृतज्ञता सोहळ्यात शरद पवार यांनी दिला ‘त्या’ आठवणींना उजाळा

संकटात सापडलेल्यांना मदत करण्याची शिकवण यशवंतराव चव्हाण यांच्याकडून मिळाली आहे

127
Killari Earthquake : किल्लारी कृतज्ञता सोहळ्यात शरद पवार यांनी दिला 'त्या' आठवणींना उजाळा
Killari Earthquake : किल्लारी कृतज्ञता सोहळ्यात शरद पवार यांनी दिला 'त्या' आठवणींना उजाळा

किल्लारी भूकंपाला (Killari Earthquake) आज ३० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त तेथे शरद पवार यांच्या प्रती कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात बोलताना शरद पवार (sharad pawar) यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

लातूर जिल्ह्यात ३० सप्टेंबर १९९३  Sharad Pawar साली भूकंप झाला होता. ह्रदय हेलावणाऱ्या या प्रसंगाविषयी बोलताना शरद पवार म्हणाले, आजचा दिवस अस्वस्थ करणारा आहे. शेवटची परभणीची मिरवणूक झाल्यानंतर मी विश्रांती करायला गेलो आणि माझ्या घराच्या खिडक्या हलल्या. त्यामुळे मी भूकंप नोंदणी केंद्राकडे माहिती घेतली तेव्हा लातूरमध्ये भूकंप झाल्याचं कळलं. त्या क्षणी सगळ्या पदाधिकाऱ्यांना कळवलं त्यानंतर सकाळी ६ वाजता आम्ही लातूरला पोहोचलो. त्यावेळी निसर्गाची अवकृपा बघितली. किल्लारी आम्हाला दिसलं नाही.

त्यानंतर २-३ तासांत डॉक्टर आणि अधिकाऱ्यांना बोलावून पुनर्वसनाच्या कामाला सुरुवात झाली. मी तिथेच मुक्काम केला. संकट मोठं होतं. दोन्ही तालुक्यातील लोकांनी धैर्याने संकटाला तोंड दिलं, या कामात विलासराव देशमुख पद्मसिंह पाटील यांची साथ मिळाली. जिल्हाधिकाऱ्यांनीही प्रचंड काम केली, असे शरद पवार म्हणाले.

(हेही वाचा – Tiger Trafficking : देशात वाघांच्या तस्करीचे प्रमाण वाढले, वर्षभरात १४६ वाघांचा मृत्यूची नोंद)

या प्रसंगाबाबत एक आठवण सांगताना ते म्हणाले की, लातूरला जाताना एक माणूस बैलगाडीत झोपलेला दिसला. मला वाटलं त्याचे घर भूकंपात गेले. त्यामुळे तो बैलगाडीत झोपला असेल, पण तो कलेक्टर होता. दिवसभर काम केल्यामुळे थकल्यामुळे तो आराम करत होता.

कृतज्ञतेची आवश्यकता नव्हती…
संकटात सापडलेल्या लहान मुलांची व्यवस्था पुण्यात केल्यामुळे त्यांनी उत्तम शिक्षण घेतले. ही लहान मुले आता चांगल्या ठिकाणी कामाला लागली आहेत. संकटात सापडलेल्या लोकांना मदत करण्याची शिकवण यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांच्याकडून मिळाली आहे. त्यामुळे कृतज्ञतेची आवश्यकता नसल्याचे उद्गगार यावेळी शरद पवार यांनी काढले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.