मुलुंडमध्ये नागरिकांना मशिदीवरील भोंग्यांचा नाहक त्रास; Kirit Somaiya यांची पुन्हा पोलिसांत तक्रार

42
मुलुंडमध्ये नागरिकांना मशिदीवरील भोंग्यांचा नाहक त्रास; Kirit Somaiya यांची पुन्हा पोलिसांत तक्रार
मुलुंडमध्ये नागरिकांना मशिदीवरील भोंग्यांचा नाहक त्रास; Kirit Somaiya यांची पुन्हा पोलिसांत तक्रार

भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मशिदीवरील भोंग्यांबाबत पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. मुलूंड पोलिस स्टेशनचे (Mulund Police Station) वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना पत्र लिहून त्यांनी मशिदीवरील भोंग्यांबाबत तक्रार केली आहे.

( हेही वाचा : अभिनेते Sharad Ponkshe यांना ‘अभिनय कौस्तुभ’ पुरस्कार प्रदान

किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी तक्रारीत म्हटले आहे की, मुलुंड पोलीस स्टेशन (Mulund Police Station) परिसरात अनेक मशिदीवर अनधिकृतरित्या लाऊडस्पीकर\भोंगे (Bhonga) लावण्यात आले आहेत. अनधिकृतरित्या दिवसात ५ वेळा एवढ्या मोठ्या आवाजात लाऊडस्पीकर\ भोंगे वाजवणे हे बेकायदेशीर आहे, ध्वनीप्रदूषण करणारे आहे. तसेच रामगड नगर (Ramgad Nagar) जवळील मशिद, अलीबहादूर चाळ (Ali Bahadur Chawl) जवळील मशिद याठिकाणी लाऊडस्पीकर\ भोंगे यांचा अनधिकृतपणे वापर होत असतानाही मुलुंड पोलीस स्टेशन यासंबंधात काहीही कारवाई करत नाही, अशी खंतही सोमय्या यांनी व्यक्त केली. (Kirit Somaiya)

तसेच सोमय्या यांनी मुलुंड पोलिस स्टेशन (Mulund Police Station) येथे जाऊन यासंदर्भात तक्रार केली आहे. तसेच याप्रकरणी कारवाई करण्याचे पोलिस अधिकाऱ्याने मान्य केले असल्याचे भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी सांगितले.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.