बांगलादेशी रोहिंग्यांना दिले बनावट जन्मदाखले; Kirit Somaiya यांनी पोलिसांना दिले ४६८ पानाचे पुरावे

50
बांगलादेशी रोहिंग्यांना दिले बनावट जन्मदाखले; Kirit Somaiya यांनी पोलिसांना दिले ४६८ पानाचे पुरावे
बांगलादेशी रोहिंग्यांना दिले बनावट जन्मदाखले; Kirit Somaiya यांनी पोलिसांना दिले ४६८ पानाचे पुरावे

अमरावती महानगरपालिका (Amravati Municipal Corporation) क्षेत्रात ४ हजार ५०० बांगलादेशी (Bangladeshi) रोहिंग्यांना बनावट कागदपत्राच्या आधारे प्रशासनाने जन्मदाखले दिल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला. आतापर्यंत सहा लोकांवर बनावट कागदपत्र दिल्याचा आरोप करत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

( हेही वाचा : ठाण्यात उभारणार कन्व्हेंक्शन सेंटर; खासदार Shrikant Shinde यांची माहिती

दरम्यान, दि. ६ मार्च रोजी किरीट सोमय्या यांनी अमरावतीच्या (Amravati) गाडगे नगर पोलीस स्टेशनमध्ये (Gadge Nagar Police Station) पोलीस निरीक्षक व पोलीस उपायुक्त यांची भेट घेत त्यांच्यासोबत चर्चा केली. सोमय्या यांनी ४६८ पानाचे पुरावे पोलिसांना दिले. यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. किरीट सोमय्या (Kirit Somaiya) म्हणाले, ५० लोकांनी जन्म दाखल्यांसाठी कुठलाही पुरावा दिला नाही. तर आज पोलिसांनी माझा जबाब नोंदवला आहे, तर अमरावती जिल्हाधिकारी सौरभ कटीयार (Saurabh Katiyar) विरोधात केंद्र सरकारकडे तक्रार केली आहे. अमरावती जिल्ह्यात पाच ठिकाणी नायब तहसीलदार यांनी सुनावणी केली. ते आदेश बेकायदेशीर आहे. अमरावती शहरात साडेचार हजार जन्मदाखले बोगस आहेत. ते ताबडतोब रद्द करा व सर्वांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी यावेळी सोमय्या यांनी केली.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.