मशिदीचा नावाने मोठ्या प्रमाणात Land Jihad जमीन बळकावण्याचे कारस्थान मुंबई (Mumbai), भाईंदर, नवी मुंबई, वसई. विरार, कल्याण, डोंबिवली, पनवेल विभागात सुरु आहे. अशा अनाधिकृत मशिदीवरील भोंग्याला पोलिस परवानगी देऊ नये, अशी मागणी भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केली आहे. तसेच सोमय्या (Kirit Somaiya) यांनी अनाधिकृत मशिदींविरोधात कठोर नियमावली बनवण्यासाठी आणि कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. त्यात सोमय्या यांनी घाटकोपर आणि भांडुपचा अशा 25 अनधिकृत मशीद/भोंग्याची माहिती ही दिली आहे.
( हेही वाचा : Jhatka Meat : खाटिक समाजाच्या व्यवसायाचे अस्तित्व धोक्यात!)
पत्रात किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी लिहले की, विधानसभेत आपण मशिदींवरील भोंगे / लाऊडस्पीकर संबंधात पोलीस परवानगी तसेच भोंग्यांमुळे त्याच्या आवाजामुळे होणारे ध्वनिप्रदूषण, लोकांच्या तक्रारी, अधिकृत मस्जिद व अनधिकृत मस्जिदसाठी देण्यात येणाऱ्या पोलीस परवानगी संबंधात कारवाईची घोषणा केली. गेल्या दोन महिन्यात मी या संबंधात अनेक पोलीस स्टेशन, मशिदीवरील भोंगे, लावण्यात आलेले भोंगे, दिलेल्या/न दिलेल्या परवानग्या या भोंग्यांमुळे अनावश्यक होणारा गोंगाट, आसपासच्या वस्तीतील लोकांना होणारा त्रास यासंबंधात भेटी दिल्या, चर्चा केली. मुंबईतील मुलुंड, भांडूप, विक्रोळी (पार्कसाईट), घाटकोपर (पश्चिम) इत्यादी पोलीस स्टेशनला भेटी दिल्या. आसपासच्या काही मस्जिद व त्याच्या नजिकच्या वस्त्यांना भेट दिली, असे सोमय्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) उद्देशून म्हणाले.
किरीट सोमय्या यांनी नोंदवलेली निरीक्षणे:
1. मोठ्या प्रमाणात मशिदीच्या नावाने अनधिकृत घरे, झोपड्या, चाळी, वाढीव बांधकाम होत आहे.
2. यावर भोंगे लावून ती मस्जिद आहे असे सांगून महापालिका व पोलीस यांच्या निर्बंधांतून वाट काढण्याचा हा एक डाव आहे. 3. अश्या पद्धतीने काही ठिकाणी जमिनी बळकावण्याचा प्रयत्न सुरु आहे.
4. अनेक ठिकाणी सरकारी जमिनीवर, मैदानावर, हरित पट्ट्यावर किंवा समृद्राच्या लगतच्या खारफुटीवर अनधिकृत बांधकाम करून त्याला मशिदीचे नाव देण्यात येते.
5. यावर भोंगे ही लावले जातात पण अशाप्रकारच्या बहुतेक मशिदीसाठी पोलीस, महापालिकेकडून भोंग्यांची परवानगी ही घेत नाहीत.
6. उदा. घाटकोपर (पश्चिम) पोलीस स्टेशनला मी भेट दिली. त्यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी असे सांगितले कि, आमच्या इथून एकाही मस्जीदिच्या भोंग्याला परवानगी दिलेली नाही.
7. त्यावर आम्ही आक्षेप घेतल्यानंतर मशिदीवर जर भोंगे लावले असतील तर त्याची परवानगी आ
वश्यक आहे, हे सांगितल्यानंतर पुढच्या 4 दिवसांत 33 मस्जीदिंच्या प्रतिनिधींनी पोलीस स्टेशनला परवानगीसाठी अर्ज दिला.
8. पोलीस परवानगी देताना एका वेळेला 30 दिवसांसाठी ची परवानगी देतात, सकाळी 06 ते 10 वाजेपर्यंतची ही परवानगी असते.
9. याचे दर 30 दिवसांनी नूतनीकरण केले जाते म्हणजेच स्थिती अशी आहे कि, वर्षाचे 365 दिवस सकाळी 06 ते रात्री 10 वाजेपर्यंत मशिदीवरील भोंग्यांना परवानगी.
10. परवानगी देताना पोलीस स्टेशन कोणत्याही प्रकारचे पुरावे, मशिदीची मालकी, अधिकृतता/अनधीकृतता, मशिद आहे कि नाही किंवा दोन-चार खोल्या उभारून उभं करण्यात आलेले बेकायदेशीर बांधकाम आहे, अशी कोणताही तपास, चौकशी केली जात नाही.
11. या मशिदीवरील लावण्यात आलेले भोंगे हे बाहेरच्या दिशेने असतात म्हणजेच आसपासच्या लोकांना आवाज ऐकवण्यासाठी असतात.
12. धर्म स्थान असो कि कोणताही कार्यक्रम असो भोंगे, लाऊडस्पीकर जो बोलणारा व्यक्ती असतो संत, महात्मा, मौलाना असतो त्यांना ऐकायला येणाऱ्या लोकांसाठी ध्वनिवर्धक असते.
13. भेटी देताना असे लक्षात आले कि हे सगळे भोंगे मोकळ्या वातावरणात, बाहेरच्या दिशेने, आसपासच्या हजारो लोकांना जे विविध धर्मातील असतात त्यांना तो आवाज जावा यासाठी दिसतात.
14. ह्या भोंग्यासंबंधी आलेल्या तक्रारीची नोंदही घेतली जात नाही.
15. भोंग्यांचा आवाज किती मोठा आहे, त्याचे कधीही ध्वनिवर्धक द्वारा चौकशी, तपासणी केली जात नाही.
16. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) किंवा त्यांच्या अधिकारी ही ह्या ध्वनी प्रदूषणाची फारशी चौकशी करीत नाहीत, कार्यवाही करीत नाहीत.
17. जी स्थिती घाटकोपर (पश्चिम) ची आहे, तीच अन्य पोलीस स्टेशनची आहे किंवा बहुतेक ठिकाणच्या मशिद, भोंगे त्यांच्या परवानगी, कायदेशीर/बेकायदेशीरपणा हे महाराष्ट्रात जवळ-जवळ सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये आहे.
यासाठी आपण पोलीस आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) यांना निर्देश द्यायला हवे, गृह मंत्रालय व पर्यावरण मंत्रालय यांनी कठोर नियमावली, Standard Operating Practice (SOP) तयार करायला हवी. मस्जिदच्या नावाने जर जमिन बळकावणे चालू असेल, खुल्या सरकारी जागेत किंवा नो डेव्हलपमेंट झोन, सीआरझेड (CRZ) मध्ये बांधकाम होत असेल त्यासंबंधी कठोर पावले व ह्या लोकांवर फौजदारी कारवाई करायला हवी. मशिदीवरील भोंग्यासंबंधी परवानगी देताना ज्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या यासंबंधात मी माझ्या काही सूचना, Suggested SOP’s सोबत देत आहे. योग्य करावे, अशी मागणी सोमय्या यांनी केली.
Join Our WhatsApp Community