मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) मशिदीवरील भोंग्यांबाबत काही दिवसांपूर्वी एक मोठी निर्णय घेतला होता. मशिदींच्या भोंग्याविरोधात आवाजाची तक्रार आल्यास पोलिसांनी दखल घेण्याचे आदेश कोर्टाने पोलिसांना दिले होते. आवाजा विरोधात तक्रार आल्यास पहिल्यांदा समज द्या, नंतर दंड आकारा, पुन्हा आदेशाचे उल्लंघन केल्यास भोंगा जप्त करा, अशा सूचना मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) पोलिसांना दिल्या होत्या. याचं दरम्यान आता भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी घाटकोपर पश्चिमेतील (Ghatkopar West) ८ मशिदींनी लाऊडस्पीकर वापरत असूनही एकाही मशिदीने (Mosque) ते वापरण्यासाठी परवानगी घेतील नसल्याची माहिती ‘एक्स’वर पोस्ट करत दिली आहे. तसेच यासंदर्भात पोलिसांकडे कारवाईची मागणी सोमय्या यांनी केली आहे. (Kirit Somaiya)
( हेही वाचा : MHADA : पुनर्विकास रखडलेल्या उपकरप्राप्त इमारतींचा ‘म्हाडा’ उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी ‘मॅरथॉन’ पाहणी करत घेतला आढावा)
दरम्यान याआधी दि. ११ फेब्रुवारी रोजी भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी भांडूप-मुलुंड लिंक रोडवरील (Bhandup-Mulund Link Road) मशिदींच्या आवाजांमुळे प्रदूषण होत असल्याची तक्रार भांडूप पोलीस ठाण्यात आणि महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाकडे (Maharashtra Pollution Control Board) केली होती. त्यावेळी सोमय्या म्हणाले होते की, मुलुंड गोरेगाव लिंक रोडवरील काही रहिवाशांनी आणि नागरिकांनी रुणवाल ग्रीन रहिवाशी संकुलच्या मागे व भांडूप सोनापूर परिसरातील मशिदीवरील भोंग्यांसंदर्भात ध्वनीप्रदूषण नियमांचे उल्लघंन होत असल्याची तक्रार माझ्याकडे केली होती. याबाबत तपासणी करून माहिती द्यावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली होती. (Kirit Somaiya)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community