Kisan Pehchan Patra : केंद्र सरकारच्या नवीन शेतकरी ओळखपत्राविषयी सर्व माहिती वाचा एका क्लिकवर

Kisan Pehchan Patra : शेतकऱ्यांचं हे नवीन ओळखपत्र पूर्णपणे डिजिटल असणार आहे

75
Kisan Pehchan Patra : केंद्र सरकारच्या नवीन शेतकरी ओळखपत्राविषयी सर्व माहिती वाचा एका क्लिकवर
Kisan Pehchan Patra : केंद्र सरकारच्या नवीन शेतकरी ओळखपत्राविषयी सर्व माहिती वाचा एका क्लिकवर
  • ऋजुता लुकतुके

केंद्रसरकारने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाकांक्षी असं किसान पेहचान पत्र आणलं आहे. आता केंद्राकडून राज्यांना या ओळखपत्राच्या वाटपासाठी आणि त्यापूर्वी शेतकऱ्यांना महिती देण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यास सांगण्यात आलं आहे. किसान पेहचान पत्र हे शेतकऱ्यांसाठी असलेलं डिजिटल ओळखपत्र असणार आहे. ते शेतकऱ्यांच्या आधार कार्डाशी जोडलेलं असेल. शेतकऱ्याच्या नावावर असलेल्या जमिनीचा सात-बाराचा उतारा, तिथे घेतली जाणारी पीकं, त्यातून निघणारं उत्पन्न हे सगळं या कार्डात डिजिटल पद्धतीने साठवता येईल. (Kisan Pehchan Patra)

(हेही वाचा- Vinod Kambli : विनोद कांबळीची तब्येत नेमकी कशाने बिघडते? शाळकरी मित्रानेच सांगितलं)

केंद्रसरकारने २०२७ पर्यंत ११ कोटी शेतकऱ्यांसाठी अशी ओळखपत्र वितरित करण्याचं उद्दिष्टं ठेवलं आहे. त्यासाठी राज्यांनी शेतकऱ्यांचे मेळावे भरवावेत असं त्यांना सांगण्यात आलं आहे. कर्नाटक सरकारने शेतकऱ्यांसाठी फ्रूट्स हे ऑनलाईन पोर्टल तयार केलं आहे. यात शेतकरी आणि शेतजमिनीविषयीची सगळी माहिती एकत्रित साठवता येते. जमिनीच्या मालकीची सगळी ओळख यातून पटवता येते. या भूमी कार्यक्रमावर आधारित अशी ही किसान पेहचान पत्राची योजना आहे. (Kisan Pehchan Patra)

आधार, डिजीलॉकर आणि युपीआय या तीन भारतात विकसित झालेल्या प्रणालींच्या मदतीने शेतीविषयक सर्व कागदपत्रं आणि इतर माहिती ऑनलाईन संकलित व्हावी असा हा उपक्रम आहे. शेतीच्या डिजिटल प्रक्रियेसाठी केंद्रसरकारने २,८१७ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. (Kisan Pehchan Patra)

(हेही वाचा- अयोध्येतील Shree Ram Mandir चा कळस सोन्याने झळाळणार)

शेतकऱ्यांकडे किसान पेहचान कार्डं आली की, त्यांच्या जमिनीची मालकी, त्यांच्याकडे असलेली जनावरं, शेतात ते घेत असलेलं उत्पादन याची नोंद ऑनलाईन होईल. आणि पीक विमा, पीक कर्जं तसंच इतर सरकारी योजनांचा फायदा शेतकऱ्यांना थेट होऊ शकेल. राज्यांना प्रत्येक नोंदणी कार्यशाळेसाठी १५,००० रुपये आणि एका किसान पेहचान कार्डावर प्रत्येकी १५ रुपये मिळणार आहेत. (Kisan Pehchan Patra)

ज्या शेतकऱ्यांना किसान पेहचान कार्डासाठी नोंदणी करायची असेल त्यांना स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून माहिती घेता येईल. किंवा ही नोंदणी ऑनलाईनही होऊ शकते. राज्यांनी यासाठी स्वत:ची पोर्टल सुरू केली आहेत. तिथे नोंदणी करता येईल. नोंदणीसाठी तुमच्याकडे आधार कार्ड, जमिनीची कागदपत्रं आणि पिकांची माहिती आणि बँक खात्याचे तपशील असणं आवश्यक आहे.  (Kisan Pehchan Patra)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.