माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. किशोरी पेडणेकर यांना ED ने समन्स बजावला आहे. कोरोनाकाळातील खिचडी घोटाळा प्रकरणी हा समन्स बजावला असून बुधवार, ८ नोव्हेंबर रोजी हजर राहण्यास त्यांना सांगण्यात आले आहे. ईडीच्या कार्यालयात त्यांची चौकशी केली जाणार आहे.
बुधवारी, सकाळी 11 वाजता हजर राहण्याचे आदेश
आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने त्यांची यापूर्वी चौकशी केली होती. त्यानंतर आता ED ईडीकडूनही त्यांना समन्स बजावण्यात आला आहे. ईडीने त्यांना सकाळी 11 वाजता हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. पालिकेचे वरिष्ठ अधिकारी पी वेलारसू यांना देखील ईडीने समन्स पाठवला आहे. यामुळे माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
(हेही वाचा Kohinoor Square : दादरच्या कोहिनूर स्क्वेअर पार्किंगमध्ये भीषण आग)
मृतदेह ठेवण्यासाठी पिशव्या खरेदीचीही चौकशी होणार
कोरोना काळात मृतदेह ठेवण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या पिशव्याप्रकरणीही चौकशी होणार आहे. माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) व अतिरिक्त महापालिका आयुक्त पी. वेलारसू यांना समन्स बजावले आहे. वेलरासू यांना मंगळवारी, तर पेडणेकर यांना बुधवारी चौकशीला बोलावण्यात आहे. महापालिकेने ८ मार्च २०२० मध्ये मृतदेह ठेवण्यासाठी एक हजार पिशव्यांच्या खरेदीचा निर्णय घेतला होता.
Join Our WhatsApp Community