पुण्यातील ससून रुग्णालयातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेलेला ड्रगमाफिया ललित पाटील (Lalit Patil) याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने तामिळनाडूतील चेन्नई येथे अटक केली. तो २ ऑक्टोबरला रुग्णालयातून पळून गेला होता. गेल्या १५ दिवसांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते.
ललिल पाटील (Lalit Patil) रुग्णालयातून पळून गेल्यानंतर रुग्णालय प्रशासन आणि येरवडा कारागृह प्रशासन याबाबत अनेक आरोप- प्रत्यारोप होत होते. राजकीय आरोप-प्रत्यारोपांचाही यामध्ये समावेश झाला. यादरम्यान पुणे पोलिसांनी ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे यांना उत्तर प्रदेश येथून अटक केली. त्या दोघांना २० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
(हेही वाचा – Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्याच्या कुुटुंबीयांना सरकारकडून 10 लाखांची मदत, तर..)
अशातच आता ललित पाटील (Lalit Patil) प्रकरणात रोज धक्कादायक माहिती समोर येत आहे. काल ललित पाटीलचे फाईव्ह स्टारमधील फोटो समोर आले. तर आज ललित पाटील या ड्रग्जच्या काळ्या धंद्यातून लाखो रूपये कमवत असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.
ललित पाटील (Lalit Patil) आणि त्याचा भाऊ भूषण पाटील त्यांच्या नाशिकमधील ड्रग्ज फॅक्टरीतून दर महिन्याला तब्बल ५० लाखंचा निव्वळ नफा कमवायचे, ही माहिती पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे. 2021 सालापासून नाशिकच्या शिंदे गावात एमडीचं उत्पादन सुरू होतं. पाटील बंधू दर महिना 50 किलो एमडीची निर्मिती करायचे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार पाटील बंधू मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि नाशिकमध्ये एमडीची विक्री करत होते. ड्रग्ज पेडलर्सच्या नेटवर्कच्या मदतीने त्यांचा एमडीचा (Lalit Patil) पुरवठा सुरू होता. आत्तापर्यंत या प्रकरणात मुंबई पोलिसांकडून १६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील आणि त्यांचा साथीदार अभिषेक बलकवडेचा देखील लवकरच घेणार मुंबई पोलीस ताब्यात घेणार आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community