आता होळी जवळ येत आहे. लांब कुठेतरी फिरायला जाण्याचा वा गावी जाण्याचा तुमचा प्लॅन असेल, तर प्रवास करण्यासाठी लांब पल्ल्याच्या या गाड्यांना जाहीर करण्यात आलेली आचासंहिता वाचा, नाहीतर तुम्ही अडचणीत येऊ शकता. मात्र आता प्रवाशांच्या झोपेत कोणताही अडथळा येऊ नये आणि त्यांना प्रवासादरम्यान शांत झोप घेता यावी यासाठी रेल्वेने नियम केला आहे. या नवीन नियमाबद्दल जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे.
तर कारवाई होणार
नव्या नियमानुसार आता तुमच्या सीट, डब्यात किंवा डब्यातील कोणताही प्रवासी मोबाईलवर मोठ्या आवाजात बोलू शकणार नाही आणि मोठ्या आवाजात गाणीही ऐकू शकणार नाही. प्रत्यक्षात प्रवाशांनी केलेल्या अशा अनेक तक्रारींनंतर रेल्वेने हा नियम केला आहे. आता यामुळे कोणत्याही प्रवाशाच्या झोपेचा त्रास होणार नाही. एवढेच नाही तर या नियमांचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर कारवाईची तरतूद आहे.
( हेही वाचा ‘असा’ चुकवत होता कर, अखेर अटक! )
म्हणून हे नवे नियम
मोबाईलवर गाणी ऐकण्याबरोबरच लोक ग्रुपमध्ये बसून मोठमोठ्याने बोलतात आणि हसतात, विनोद करतात अशा अनेक तक्रारीही रेल्वेकडे आल्या होत्या. याशिवाय दिवा लावणे आणि विझविण्याबाबतही अनेक वाद झाले आहेत. यामुळे रेल्वे मंत्रालयाने हे नवे नियम केले आहेत.
Join Our WhatsApp Community