घाईच्या वेळी स्वयंपाक करत असताना अचानक गॅस संपल्यामुळे गृहीणींची अनेकदा तारांबळ उडते. त्यामुळे साधारणपणे गॅस सिलेंडर संपण्याची वेळ जवळ आल्यावर गृहिणींच्या मनात धाकधूक असते. त्यामुळे सिलेंडर कधी संपणार याचा अंदाज गृहिणी अनेकदा मांडत असतात. त्यामुळे गॅस सिलेंडर कधी संपणार हे जाणून घेण्यासाठी काही टिप्सबाबत आपण माहिती जाणून घेऊया…
(हेही वाचाः ‘काका असूनही विक्रम गोखलेंच्या निधनाबाबत पोस्ट का शेअर केली नाही?’, अभिनेत्री सखी गोखलेने ट्रोलर्सना दिले उत्तर)
एलपीजी गॅस सिलेंडर कधी संपणार याचा अंदाज अनेकदा गॅस बर्नरच्या ज्वालांद्वारे लावण्यात येतो. सिलेंडरमधील एलपीजी गॅस जर का संपत आला असेल तर गॅस बर्नरमधून येणा-या ज्वालांचा रंग हा निळा होतो आणि त्याद्वारे गॅस संपणार असल्याचा अंदाज बांधण्यात येतो. पण प्रत्येक वेळी ही अंदाज खरा असतोच असे नाही, कारण अनेकवेळा गॅसच्या बर्नरमध्ये काही बिघाड झाल्यामुळेही ज्वालांचा रंग बदलू शकतो. त्यामुळे एका सोप्या पद्धतीने आपल्याला सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे याचा अचूक अंदाज लावता येतो.
वापरा ही सोपी ट्रिक
- सिलेंडरमध्ये किती ग्रस शिल्लक आहे हे तपासण्यासाठी सिलेंडरच्या आकाराचे एक ओले फडके घ्या
- हे फडके सिलेंडरभोवती मिनीटभर गुंडाळून ठेवा
- हे फडके काढल्यानंतर हळूहळू सिलेंडर टाकीच्या रंगात होत असलेले बदल तपासा
- काही वेळाने आपल्याला सिलेंडरचा काही भाग वाळलेला दिसेल, तर काही भाग ओलाच राहील
- सिलेंडरमधील रिकामा भाग हा गरम असल्यामुळे त्यामध्ये पाणी लवकर शोषले जाते, त्यामुळे तो भाग लगेच वाळतो
- पण सिलेंडरचा गॅस भरलेला भाग हा तुलनेने थंड असल्यामुळे तो भाग वाळण्यासाठी वेळ लागतो
- या सोप्या पद्धतीने आपल्याला सिलेंडरच्या टाकीत किती गॅस शिल्लक आहे ते ओळखता येते
(हेही वाचाः राज्यात 39 लाख विद्यार्थ्यांना मोफत जेवण आणि पुस्तके मिळण्यात येणार अडचण? काय आहे कारण)
Join Our WhatsApp Community