आंतरराष्ट्रीय दर्जा लाभणारे रामसर स्थळ म्हणजे नक्की काय, ठाणे खाडीला का मिळाला रामसर दर्जा?

156

रामसर जागा घोषित झालेल्या पाणथळ जागांना पर्यावरणदृट्या असलेले महत्त्व जगासमोर आणण्याचा हा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा प्रयत्न आहे. रामसर जागा घोषित झाल्यानंतर जैवविविधता जपण्याचे कार्य अधिक जोमाने करणे अपेक्षित असते.

पाणथळ जागांचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी १९७१ साली इराण देशातील रामसर शहरात परिषद आयोजित करण्यात आली होती. जगभरातील विविध देशांच्या सदस्यांनी सहभाग घेतला होता. पाणथळ जागांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने आपापल्या देशातील पाणथळ जागांना संरक्षणात्मक दर्जा देण्याासाठी करार करण्याचे ठरवले. या कराराला रामसार कन्व्हेन्शन असे संबोधले जाते. तर रामसर दर्जा प्राप्त झालेल्या पाणथळ जागांना ‘रामसर स्थळ’ असे संबोधले जाते. भारताने रामसर कन्व्हेन्शनवर १ फेब्रुवारी १९८२ रोजी स्वाक्षरी केली. रामसर कन्व्हेन्शननुसार पाणथळ जागेची व्याख्याही ठरली आहे. ताजे किंवा खा-या पाण्याचा नैसर्गिक जलस्त्रोताचा साठा, समुद्राला लागून असलेला दलदल किंवा खारफुटींचा भाग ज्यात समुद्रालगतच्या पाण्याची खोली सहा मीटरपेक्षा अधिक नसते, अशा ठिकाणांना पाणथळ जागा असे संबोधले जाते.

thane

ठाणे खाडीचे महत्त्व 

  • आशियातील सर्वात मोठी खाडी असलेली ठाणे खाडी ही मुंबईच्या किनारपट्टी भागांजवळ वसलेली आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई असे तिन्ही शहरांच्या किनारपट्टी भागांत ठाणे खाडीचा भूभाग आढळतो. ठाणे खाडी पाणथळ जागा जाहीर करण्याच्या निकषांच्या आधारावर जाहीर करण्यात आली आहे.
  • अशियातील सर्वात मोठ्या खाडींपैकी एक असलेली ठाणे खाडी, काही प्रमाणात मुंबई शहराच्या किनारपट्टीवर वसली आहे. पश्चिम किनारी बृहन्मुंबई जिल्हा, तर पूर्व किनारा ठाणे आणि नवी मुंबईच्या दिशेने आहे.
  • ठाणे खाडीच्या दोन्ही किनारी कांदळवने असून, देशात आढळणाऱ्या एकूण खारफुटींपैकी २० टक्के प्रजाती येथे आढळतात. ज्यामध्ये १३ खारफुटी प्रजाती असून, ३६ मॅनग्रूव्ह अलाईज प्रजाती आहेत. तसेच राखाडी खारफुटीच्या झाडांचा मोठा समूहदेखील या भागांत आढळतो. नैसर्गिक संरक्षण क्षेत्र (बफर झोन), भूक्षेत्राचे वादळापासून संरक्षण, भरती ओहोटी, समुद्राच्या पाण्याचे आक्रमण आणि इतर नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण म्हणून कांदळवन काम करते. कांदळवन स्थानिक मासेमारीस, तसेच अनेक माशांच्या प्रजातींच्या वाढीसाठी मदत करते.

(हेही वाचा वीर सावरकरांच्या छायाचित्राला विरोध; SDPI च्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल)

  • ठाणे खाडीच्या काठावर कांदळवनाचे क्षेत्र आहे. देशात आढळून येणा-या २० टक्के खारफुटींच्या प्रजाती ठाणे खाडीत आढळतात.
  • स्थलांतरित पक्षी भारतात पाणथळ जागा आपल्या उड्डाण मार्गातील प्रवासाचा थांबा म्हणून वापरतात. या स्थलांतरित पक्ष्यांना मध्य आशियाई मार्गातील ठाणे खाडी हा महत्त्वाचा थांबा आहे. हिवाळ्यात स्थलांतरित पक्षी मोठ्या संख्येने ठाणे खाडीत पाहायला मिळतात. त्यापैकी ग्रेटर आणि लेसर या दोन्ही फ्लेमिंगो पक्ष्याच्या दोन प्रजाती लाखोंच्या संख्येने खाडीपरिसराला हिवाळ्यात गुलाबा झालर देतात.
  • वन्यजीव (संरक्षण) कायदा १९७२ नुसार ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्यास सागरी संरक्षित क्षेत्र ठरविले आहे. या खाडी क्षेत्रात २०२ प्रजातींचे पक्षी आढळतात. त्यापैकी काही संकटग्रस्त प्रजाती आहेत. इतर प्राण्यांमध्ये झूप्लँक्टनच्या २४ प्रजाती, फायटोप्लँक्टनच्या 35 प्रजाती, फुलपाखरांच्या 59 प्रजाती, किटकांच्या 67 प्रजाती, 18 प्रजातींचे मासे, क्रस्टेशियन आणि बेंथोसच्या 23 प्रजाती येथे आढळतात.
  • जगभरातील एकूण रामसर स्थळे – २ हजार ४५३
  •  भारतातील रामसर स्थळे – ७५
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.