ऑगस्ट संपूर्ण कोरडा गेल्यानंतर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार पावसाने उपस्थिती लावली आहे. (Rain Alert) भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) मुंबईत पुढील ४ दिवस कधी आणि किती पाऊस पडेल, याचा अंदाज वर्तवला आहे. ७ सप्टेंबर रोजी मुंबईसह आजूबाजूच्या भागात पावसाच्या हलक्या सरी बरसतील. पावसाच्या उपस्थितीमुळे दहीहंडी उत्सवही पावसातच पार पडत आहे. काही ठिकाणी गोविंदा पथकांचा खोळंबा झाला, तर काही ठिकाणी तुरळक पावसाचा आनंद गोविंदा पथकांनी लुटला आहे.
आयएमडीने मुंबईसाठी ७, ८, ९ सप्टेंबरला ग्रीन अलर्ट जारी केला आहे. या ३ दिवसात मुंबईत हलक्या सरींसह पाऊस पडेल, असा अंदाज आहे. तसेच १० सप्टेंबरला मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. १० सप्टेंबर रोजी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. (Rain Alert)
भारतीय हवामान खात्याचे अधिकारी के. एस. होसाळीकर यांनीही ट्वीट करत मुंबई-ठाण्यातील पावसाच्या अंदाजाची माहिती दिली. ते म्हणाले, “७ सप्टेंबरला मुंबई, ठाणे आणि बाजूबाजूच्या भागात मागील २४ तासात चांगल्या पावसाची नोंद झाली. यातील बहुतांश पाऊस सकाळच्या वेळेत पडला. पावसाचे अखेर शहरात आगमन झाले आहे.”
3 Sept:राज्यात पुढच्या 4,5 दिवसात पाउस शक्यता.बंगालच्या उपसागरात चक्राकार स्थिती, येत्या ४८ तासात तेथे कमी दाबाचे क्षेत्र.
3-7 Sept,#कोकण #गोव्यात हलका-मध्यम मेघगर्जना,विजांच्या कडकडाटासह काही मुसळधार पावसाची शक्यता
5-7 Sept दरम्यान #मध्यमहाराष्ट्र, #मराठवाडा, #विर्दभात पाउस
-IMD pic.twitter.com/nRkgvNxCGN— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 3, 2023
७ सप्टेंबरला राज्याच्या सर्वच भागात पाऊस अंदाज वर्तवण्यात आला आहे. यात उत्तर कोकण, मराठवाडा, उत्तर मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भासह गोव्याचाही समावेश आहे. गेले अनेक दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. राज्यातील बहुतांश भागात पुढील दोन – तीन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मुंबई, ठाणे, पालघरसह रायगड, रत्नागिरी, तसेच सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी विदर्भातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. मराठवाड्यात देखील पावसाचे कमबॅक होऊ शकते. मराठवाड्यात उस्मानाबाद, लातूर, नांदेड, जालना, परभणी हिंगोली, या जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे.