सोशल मीडियाचा वापर सध्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे आता सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणा-यांची संख्याही काही कमी नाही. गोडगोड बोलून, आपबिती सांगून ते सहज गंडा घालतात. त्यांच्यापासून सावध राहण्याच्या या काही टिप्स आहेत, त्यांचे जर पालन केले तर तुमचे बॅंक खाते रिकामे होण्यापासून वाचू शकते.
- सायबर भामटे व्हाॅट्सअॅप, फेसबुक आणि अन्य सोशल मीडियाचा वापर करणा-या युझर्सवर लक्ष ठेवतात आणि त्यांना लक्ष्य करतात.
- आपल्याला काही लिंक येत असतात. त्या लिंक डाऊनलोड केल्यानंतर, बोगस ब्राउजर एक्सटेंशन डाऊनलोड होते. आणि वापरकर्त्याने लिंक एॅक्टिव्ह केली की तो सायबर भामटा खासगी माहिती चोरतो आणि बॅंक अकाऊंट रिकामे करतो.
- त्यामुळे सोशल मीडिया हाताळताना सजग राहणे आवश्यक आहे. आमिष दाखवणा-या, मदत मागणा-या, गेम्सच्या माध्यमातून बक्षिस जिंकण्याची ऑफर देणा-या या फ्राॅड लिंकपासून दूर राहणे आवश्यक आहे.
- सोशल मीडिया वापरताना तुमची अत्यंत वैयक्तिक माहिती फेसबुक प्रोफाईलवर शेअर करु नका. तुमच्या घरचा पत्ता, मोबाईल क्रमांक, जन्मातारीख ही माहिती सार्वजनिक करु नका. कोणत्याही अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका. फेसबुकच्या वापरानंतर खाते लाॅग आऊट करा.
( हेही वाचा: अखेर ठरलं! पुण्यातील चांदणी चौकातील जुना पूल ‘या’ दिवशी पाडण्यात येणार )
- तसेच, सर्वेच्या नावाखालीदेखील फसवणूक होते. त्याआधारे तुमची वैयक्तिक माहिती विचारली जाते आणि त्याचा गैरवापर केला जातो. त्यामुळे अनोळखी सर्वे अथवा व्यक्तीला तुमचा मोबाईल क्रमांक देऊ नका.
- तुमच्या क्रेडिट अथवा डेबिट कार्डचा क्रमांक, सीव्हीव्ही, पिन, ओटीपी, इंटरनेट बॅंकिंग, युझर आयडी, युनिक रजिस्ट्रेशन क्रमांकदेखील कोणालाच शेअर करु नका. याच माध्यमातून सर्वाधिक फसवणूक केली जाते.