तुमच्या पाल्याला स्कुल बसने शाळेत पाठवताय का? तर ही बातमी तुमच्यासाठी

122

विद्यार्थ्यांच्या शालेय बस, व्हॅनचे चालक-मालक नियमांचे सर्रास उल्लंघन करत असून, त्यामुळे विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागत आहे. राज्यातील 965 शालेय बस, व्हॅनकडे फिटनेस सर्टिफिकेट नसल्याचे आढळले आहे. नियमांचे उल्लंघन करणा-या बस आणि व्हॅनविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश परिवहन आयुक्त कार्यालयाने राज्यातील सर्वच आरटीओंना दिले आहेत.

परिवहन विभागातर्फे 26 ते 31 जुलै या कालावधीत अनधिकृत स्कूल व्हॅन व स्कूल बस यांची विशेष तपासणी मोहिम राबवण्यात आली. त्यात राज्यात एकूण 1 हजार 661 परवानाधारक वाहने व 592 विना परवानाधारक वाहने अशा एकूण 2 हजार 253 वाहनांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये 965 शालेय बस, व्हॅनकडे फिटनेस सर्टिफिकेट नसल्याचे, आढळले आहे.

( हेही वाचा: संभाजीराजे छत्रपतींकडून परिवर्तनाच्या क्रांतीची घोषणा! म्हणाले, भेटूया… )

पालकांनो लक्ष द्या

आपले मूल ज्या बस किंवा व्हॅनमधून शाळेत जाते. त्या बस अथवा व्हॅनचा चालक/मालक व त्या वाहनाची माहिती ठेवावी. काही शंका आल्यास त्याबाबत जवळच्या प्रादेशिक परिवहन, कार्यालयाशी संपर्क साधून शंका निरसन करुन घ्यावे. ज्या शाळांमध्ये मूले व्हॅनद्वारे अथवा स्कूलबस द्वारे येतात, त्या शाळांचीही स्कूल बस किंवा व्हॅनच्या चालक/ मालकांबाबत तसेच वाहनाबाबत पुरेशी माहिती ठेवावी. काही शंका असल्यास, सबंधित प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधून शंका निरसन करुन घ्यावे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.