अ‍ॅडमिशनला जाताय? ही कागदपत्रे जवळ ठेवा

राज्य शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विविध अभ्यासक्रमात अॅडमिशनसाठी पालक आणि विद्यार्थ्यांची लगबग सुरु झाली आहे. कागदपत्रांची जुळवाजुळव महत्त्वाची असून, त्यासाठी धावपळदेखील वाढली आहे. विद्यार्थ्यांनी कोणत्याही अभ्यासक्रमासाठी प्रवेशाचा फाॅर्म भरताना आवश्यक ती कादगपत्रे पूर्ण आहेत की नाही, याची शहानिशा करणे गरजेचे आहे.

मेडिकल प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे

 • नीट ऑनलाईन फाॅर्मची प्रिंट
 • नीट प्रवेश पत्र व नीट मार्कलिस्ट
 • मार्क मेमो 10 वी, सनद 10 वी, मार्क मेमो 12 वी
 • नॅशनॅलिटी सर्टिफिकेट
 • रहिवाशी प्रमाणपत्र, आधार कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र किंवा वडिलांचा फाॅर्म नंबर 16
 • 12 वीची टीसी
 • मेडिकल सर्टिफिकेट फिटनेस
 • मुलाचे राष्ट्रीय बॅंकेतील खाते पासबूक
 • मुलाचे तसेच आई व वडील दोघांचेही पॅनकार्ड

( हेही वाचा: EPFO च्या खातेधारकांच्या निवृत्ती वेतनात तिप्पट वाढ! )

मागासवर्गीयांसाठी वरील सर्व कागदपत्रांसह खालील प्रमाणपत्रेही आवश्यक

इतर अभ्यासक्रमात प्रवेश घेताना आवश्यक दस्तावेज

 • जात प्रमाणपत्र
 • जातवैधता प्रमाणपत्र
 • नाॅनक्रिमिलेयर प्रमाणपत्र
 • डोमिसाइल प्रमाणपत्र
 • ईडब्ल्यूएस वर्ग प्रमाणपत्र
 • दिव्यांगता प्रमाणपत्र
 • आधार क्रमांक, बॅंक खाते पासबूक
 • सैन्यदल वर्गाचे प्रमाणपत्र
 • अल्पसंख्यांक वर्गाचे प्रमाणपत्र

या सर्व गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा

 • अर्ज चुकू नये म्हणून सुरुवातीला झेराॅक्सवर माहिती भरा. त्यानंतर अर्जात ती माहिती भरा. एखादा मुद्दा न कळल्यास मार्गदर्शन घ्या.
 • अर्ज भरायच्या तारखा आणि वेळापत्रकाचे कसोशीने पालन करा.
 • इतर क्षेत्रांमध्ये मिळवलेल्या प्रमाणपत्रांच्या अटेस्टेड काॅपी बरोबर ठेवा.
 • ब-याच वेळेला ऑनलाइन अर्जप्रक्रिया पूर्ण करायच्या असतात. त्यासाठी संबंधित कागदपत्रे स्कॅन करा. ते पेनड्राइव्हवर सेव्ह करुन ठेवा आणि तो जवळ बाळगा.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here