सोशल मीडियावरील फसवणूकीपासून वाचण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

105

सायबर गुन्हेगार नेहमीच नवनव्या क्लृप्त्या वापरुन सोशल मीडिया, फेक काॅल आणि अनोळखी लिंकच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक करतात. त्यांच्या याच भूलथापांना बळी पडून अनेकांना मोठा आर्थिक फटकादेखील सहन करावा लागतो. त्यामुळे पोलीस विभागाकडून काही टिप्स देण्यात आल्या आहेत ज्याद्वारे फसवणुकीपासून संरक्षण मिळू शकेल.

या गोष्टी कटाक्षाने पाळाव्यात

  • मोबाईलवर आलेला ओटीपी शेअर करु नये
  • अनोळखी लिंक ओपन करु नये
  • कार्ड डिटेल्स कोणालाही शेअर करु नये
  • खात्री केल्याशिवाय कोणाच्याही खात्यात पैसे पाठवू नयेत

2 स्टेप व्हेरिफिकेश महत्त्वाचे

सोशल मीडिया संबंधित खातेधारकांनी आपले सोशल मीडिया प्रायव्हेट मोडवर ठेवावे. तसेच 2 स्टेप व्हेरिफिकेशन करुन ठेवावे जेणेकरुन आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी मदत होऊ शकते.

याद्वारे होऊ शकते फसवणूक

सायबर फ्राॅडमध्ये गुन्हेगार आपल्याशी तीन मार्गाने संपर्क करतो. त्यात काॅल किंवा एसएमएस केला जातो आणि जर प्रतिसाद दिला नाही तर सोशल मीडियाद्वारे संपर्क केला जातो. अनेक प्रकारचे आमिष दाखवले जाते. जसे की, लाॅटरी, विज बिल, 5 जी सेवा, अशा भूलथापांना बळी न पडता असा मेसेज आला असेल तर त्यांना त्वरित ब्लाॅक करावे.

( हेही वाचा: १ डिसेंबरपासून काय बदलणार? सामान्यांच्या खिशावर थेट होणार परिणाम…)

या अॅपपासून राहा सावध

एनी डेस्क, क्विक सपोर्ट अॅप, टीम सपोर्ट अॅप, इत्यादींसारख्या स्क्रीन शेअरिंग अॅप्लिकेशनच्या माध्यमातून पर राज्यातील गुन्हेगार कुठल्या ना कुठल्या मार्गाने एॅप्लिकेशन डाऊनलोड करायला लावतात व आपल्या मोबाईलचा एक्सेस मिळतात. याद्वारे ओटीपी शेअर होऊन आपल्या खात्यातील पैसे परस्पर वळते केले जातात. त्यामुळे अशा प्रकारचे फसवे आणि अॅप्लिकेशन डाऊनलोड न करता सावधगिरी बाळगावी.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.