शहरातल्या ट्रॅफिकला कंटाळून अनेकदा चालक हायवेचा पर्याय निवडतात. वेळ वाचवण्यासाठी निवडलेल्या या पर्यायाबद्दल अनेकदा पश्चाताप करायची वेळ येते. महामार्गावरचा प्रवास सुखकर असला तरी टोल नाक्यांवर बऱ्याचदा चालकांचा वेळ जातो. खरंतर अशा तऱ्हेने लोकांचा वेळ जाऊ नये म्हणून सरकारकडून वारंवार नानाविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र नागरिकांना याची नीट माहिती नसल्यामुळे त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच NHAI ने बनवलेल्या नियमांचे योग्य रितीने पालन केले तर प्रवाशांचा वेळ आणि पैसे दोन्ही वाचतील.
नियम काय आहेत?
२०२१च्या मे महिन्यात NHAIने महामार्गाशी संबंधित काही मार्गदर्शक तत्वे जाहीर केली होती. त्यातल्या नियमांनुसार टोल प्लाझावर प्रत्येक वाहनाचा सेवा वेळ १० सेकदांपेक्षा जास्त नसावा. महत्त्वाचे म्हणजे हा नियम पीक अवर्समध्ये लागू करण्यात येईल. सेवा वेळ म्हणजे टोल टॅक्स वसूल केल्यानंतर वाहनाला प्लाझाच्या पलीकडे जाण्यासाठी लागणारा वेळ. अनेकदा टोलच्या लांबलचक रांगेमुळे प्रवाशांचे दोन-दोन तास या रांगेत गेले आहेत. त्यामुळे टोलनाक्यांवर १०० मीटरपेक्षा जास्त लांब वाहनांची रांग नसावी.
प्रवाशांना ते अंतर समजण्यासाठी प्रत्येत टोल प्लाझावर १०० मीटरवर एक पिवळी पट्टी आखण्यात यावी. जर त्या पिवळ्या पट्टच्या पलीकडे वाहनांची रांग लागली असेल तर ती रांग १०० मीटरच्या आतमध्ये येईपर्यंत टोल न भरता वाहनांना सोडण्यात येईल.
दरम्यान रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने २०२२-२०२३ मध्ये १२,५०० किलोमीटर लांबीचे रस्ते बांधण्याचे निश्चित केले होते. ठरवलेल्या आकड्याच्या १३.७० टक्क्यांनी अपयशी होत, १०,९९३ किलोमीटर लांबीचे रस्ते बांधण्यात मंत्रालयाला यश मिळाले होते. अशा तऱ्हेच्या महामार्गांवर आतापर्यंत जवळपास १००० टोल नाक्यांची बांधणी करण्यात आली आहे.
हे बदल लवकरच होण्याची शक्यता
– सध्या सरकार एका अशा यंत्रणेवर काम करत आहे ज्यात गाडीच्या नंबर प्लेटवरूनच टोलचे पैसे कापण्यात येईल.
– यामुळे फास्टटॅग सुविधा लवकरच कालबाह्य होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community