Kokan Ganeshotsav 2023 : आता विमान प्रवासही सिझनल ! ऐन गणेशोत्सवात तिकिटाच्या दरात कैक पटीने वाढ

गणपतीनिमित्त वाढत्या गर्दीची संधी साधून कंपनीने तिकिटाचे दर वाढवले

154
Konkan Ganeshotsav 2023 : आता विमान प्रवासही सिझनल ! ऐन गणेशोत्सवात तिकिटाच्या दरात कैक पटीने वाढ
Konkan Ganeshotsav 2023 : आता विमान प्रवासही सिझनल ! ऐन गणेशोत्सवात तिकिटाच्या दरात कैक पटीने वाढ

गणपतीसाठी कोकणात जायचे ठरले, तर आता आरक्षण मिळणे अशक्य, रस्तेमार्गे जायचे तर वाहतूक कोंडी, अपघात, खड्डे…या सगळ्या अडचणींचा सामना करत ज्यांना कोकणात जायचे नसेल, अशा कोकणवासीयांसाठी विमान प्रवासाचा पर्यायही उपलब्ध आहे, मात्र गणेशोत्सवामुळे विमानाच्या तिकिट दरावरही परिणाम झाला असून विमान प्रवास अत्यंत महगडा झाला आहे. नेहमीच्या दरापेक्षा गणेशोत्सवात विमानाच्या तिकिट दरात कैक पटीने वाढ झाली आहे.

एरवी साधारण १८०० ते २८०० रुपये असलेले कोकणचे विमान तिकिट आता ऐन गणेशोत्सवात तब्बल १५ हजार रुपयांच्या घरात पोहोचले आहे. कोकणात जाण्यासाठी अलायन्स एअर कंपनीकडून मुंबई-सिंधुदुर्ग (चिपी)-मुंबई अशी विमानसेवा सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवार अशी आठवड्यातून चार वेळा चालवली जाते. त्यासाठी एटीआर 72 या लहान आकाराच्या विमानाचा वापर होतो. एरवी या विमानाचे तिकिट सरासरी १८०० ते २८०० रुपयांदरम्यान असते. गणपतीनिमित्त वाढत्या गर्दीची संधी साधून कंपनीने तिकिटाचे दर वाढवले आहेत.

(हेही वाचा – Neeraj Chopra : केवळ 0.44 सेंटीमीटरमुळं नीरज चोप्राचं सुवर्णपदक हुकलं )

किती पैसै मोजावे लागणार…
कोकणवासी सोमवारीच गावी दाखल होण्याच्या बेतात आहेत. त्याच दिवशीचे तिकीट १५ हजार ५९३ रुपये झाले आहे. शनिवारी देखील प्रवाशांनी हाच भरमसाठ दर मोजत आपले गाव गाठले. मंगळवारचे तिकीट सोमवारपेक्षा स्वस्त असले तरीही ते ६१९५ रुपये आहे. यंदा ज्येष्ठा गौरींचे आगमन गुरुवारी होत असून शुक्रवारी पूजनाचा मोठा दिवस आहे. त्यामुळे गुरुवारीदेखील या प्रवासाचे तिकीट तब्बल ९८१८ रुपये इतके आहे. शनिवारचे परतीचे तिकीटदेखील तब्बल १२ हजार ४४१ रुपयांवर गेले आहे. पुढे दोन दिवस आराम करुन सोमवारी परतणाऱ्यांना तर या प्रवासासाठी तब्बल १९ हजार ११० रुपये मोजावे लागणार आहेत. २८ रोजी दहा दिवसांचे विसर्जन करून शनिवारच्या विमानाने परतणाऱ्यांना ७७१८ रुपये मोजावे लागणार आहेत. त्यानंतर २ ऑक्टोबरचे तिकीटदेखील ९८१८ रुपये आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.