मुंबईत स्वतःचं हक्काचं घर असावं, असे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि हेच हक्काच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कोकण म्हाडाच्या घरांसाठी डिसेंबरमध्ये येत्या १० दिवसात सोडत निघणार आहे. मुंबई उपनगर असलेल्या ठाणे, नवी मुंबई, वसई-विरारसह कोकणातील वेंगुर्ल्यात २ हजारांहून अधिक घरांची सोडत म्हाडा कोकण मंडळाकडून लवकरच काढण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच परवडणाऱ्या दरात आपलं हक्काचं घर घेण्याचे स्वप्न तुमचंही पूर्ण होणार आहे.
कोणासाठी गटासाठी किती असणार घरं?
- अत्यल्प उत्पन्न गटासाठी १ हजार १
- अल्प उत्पन्न गटासाठी १ हजार २३
- मध्यम उत्पन्न गटासाठी १८
- उच्च उत्पन्न गटासाठी ४ घरांचा समावेश (वेंगुर्ला)
(हेही वाचा – … म्हणून ‘या’ भागातील PMPML सेवा पुन्हा सुरू करण्याची होतेय मागणी)
येत्या दहा दिवसांत कोकण, पुणे आणि औरंगाबाद मंडळांतील घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. कोकण मंडळातील २ हजार ४६, औरंगाबादमधील साधारण ८०० तर पुण्यातील ४ हजार ६७८ घरांसाठी एकत्रित जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. नव्या प्रणालीनुसार सोडतपूर्व आणि सोडतीनंतरची प्रक्रिया १०० टक्के ऑनलाईन असणार आहे. त्यामुळे इच्छुकांना अर्जासब आवश्यक ती कागदपत्रे सादर करावी लागणार आहे. महत्त्वाचे म्हणजे सोडतीपूर्वीच पात्रता निश्चित होणार असून पात्र अर्जदारच सोडतीत सहभागी होणार आहेत.
म्हाडाच्या सोडतीत आरक्षित घरांसाठी पत्रकार, कलाकार, माजी सैनिक, स्वातंत्र्यसैनिकांसह इतर गटांना अर्ज करता येतो. या गटातील लोकांना सोडतीत घरे आरक्षित असतात. त्यांना देखील नव्या बदलानुसार आता प्रमाणपत्रे सोडतीपूर्वीच सादर करावी लागणार आहे. या प्रमाणपत्राची छाननीही सोडती आधी होणार असून केवळ पात्र अर्जाचाच सोडतीत समावेश होईल.
Join Our WhatsApp Community