Kokan Railway: कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत; बोगद्यात पाणी आल्याने ‘या’ गाड्यांचा मार्ग बदलला तर, ‘या’ ९ ट्रेन रद्द

132
Kokan Railway: कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत; बोगद्यात पाणी आल्याने 'या' गाड्यांचा मार्ग बदलला तर, 'या' ९ ट्रेन रद्द
Kokan Railway: कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत; बोगद्यात पाणी आल्याने 'या' गाड्यांचा मार्ग बदलला तर, 'या' ९ ट्रेन रद्द

गेले चार दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे मार्गावरील गोवा राज्यातील मालपे (पेडणे-गोवा) बोगद्यात पाणी व चिखल भरल्याने मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेल्वे गाड्या ठिकठिकाणी थांबविण्यात आल्या आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू असून रात्री उशिरापर्यंत मार्ग मोकळा होईल असे रेल्वेच्या कोकण जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी सांगितले.

पेडणे गोवा मालपे या ठिकाणी पूर्वी एकदा असाच प्रकार घडला होता. आता रूळावर खालून पाणी येत आहे.सध्यस्थीतीत गोव्याकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या सिंधुदुर्गमधील काही स्थानकात थांबवून ठेवल्या आहेत तर गोव्यातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाड्या गोव्यात थांबवून ठेवण्यात आल्या आहेत. कोकण रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक आणि अभियंता मालपे गोवा येथे उपस्थित आहेत.

‘या’ गाड्यांचा मार्ग बदलला

12518 निजामुद्दीन – एरणाकुलम ही गाडी पनवेल – लोणावळा – पुणे – मिरज या मार्गाने वळवण्यात आलेली आहे. गाडी क्र. १६३३६ नागरकोइल गांधीधाम एक्सप्रेस उडुपी येथे पाठीमागे जाईल आणि शोरानूर जंक्शन मार्गे वळवण्यात येईल. ही गाडी इरोड जं. धर्मावरम गुंटकल, जं. रायचूर वाडी सोलापूर, जं. पुणे, जं. लोणावळा-पनवेलमार्ग जाणार आहे. ट्रेन क्र. १२२८३ एर्नाकुलम एच. निजामुद्दीन शोरानूर जंक्शन मार्गे वळवला जाईल. इरोड जं., धर्मावरम गुंटकल जं, रायचूर वाडी सोलापूर, पुणे जंक्शनवरून लोणावळा पनवेल मार्गे (Latest Train Update) जाईल.

रद्द करण्यात आलेल्या गाड्या

22229 Csmt – मडगाव वंदे भारत एक्सप्रेस, 12051 Csmt – मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस, 10103 Csmt – मडगाव मांडवी एक्सप्रेस, 12133 Csmt – बेंगलुरु एक्सप्रेस, 10104 मडगाव मुंबई – csmt मांडवी एक्सप्रेस, 50108 मडगाव – सावंतवाडी रोड पॅसेंजर, 22120 मडगाव – csmt तेजस एक्सप्रेस, 12052 मडगाव – csmt जनशताब्दी एक्सप्रेस, 10106 सावंतवाडी – दिवा

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.