Ambabai Temple: अंबाबाई मंदिर परिसर संगीतमय होणार, प्रशासनाकडून लवकरच ‘संगीत खांबां’ची रचना

खांबांची रचना ऐतिहासिक पद्धतीची आणि आकर्षक

177
Ambabai Temple: अंबाबाई मंदिर परिसर संगीतमय होणार, प्रशासनाकडून लवकरच 'संगीत खांबां'ची रचना
Ambabai Temple: अंबाबाई मंदिर परिसर संगीतमय होणार, प्रशासनाकडून लवकरच 'संगीत खांबां'ची रचना

करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिराला देशभरातील भाविक मोठ्या संख्येने दर्शनाकरिता येतात. दरवर्षी भाविकांच्या संख्येत वाढ होत आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुविधा देण्याबरोबरच या परिसराचा कायापालट करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून मंदिरात परिसरात आता लवकरच ‘संगीत खांब’ उभारण्याचे ठरवले आहे.

भक्तांच्या कानी मंत्रोच्चार, भक्तिसंगीत पडावे याकरिता या संगीत खाबांची उभारणी महापालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे. त्यामुळे मंदिर आणि परिसरात भाविकांना सुगम भक्तिसंगीताचा आनंदही घेता येणार आहे. त्यामुळे आता विद्युत रोषणाई आणि संगीत खांबांमुळे येथील परिसर आकर्षक होईल.

(हेही वाचा – Congress : राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करा; सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल)

80 संगीत खांबांची रचना

शिवाजी चौक ते भवानी मंडप, महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूल ते भवानी मंडप, बिनखांबी गणेश मंदिर ते भवानी मंडप आणि जोतिबा रोड या ठिकाणी 80 खांब उभारले जाणार आहेत. या खांबांची रचना ऐतिहासिक पद्धतीची आणि आकर्षक असणार आहे. जेणेकरून परिसरातील सौंदर्यात भर पडेल. या संगीत खांबातून (म्युझिक पोल) परिसरातील भाविक, पर्यटक, नागरिक यांच्या कानी भक्तिसंगीत पडणार आहे. याशिवाय या खांबामुळे अंबाबाईची आरती, मंत्रोच्चार, जपही केला जाणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.