शिवराज्यभिषेक दिनी कोल्हापुरात (Kolhapur Bandh) सात तरुणांनी आक्षेपार्ह व्हाॅट्सअॅप स्टेट्स ठेवल्याने सर्वत्र संतप्त वातावरण झाले. या घटनेनंतर कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांनी या तरुणांविरोधात कारवाई करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेत कोल्हापूर बंदची हाक दिली होती. त्यानुसार काल म्हणजेच बुधवार ७ जून रोजी कोल्हापूर बंद करण्यात आले. मात्र या बंदने कालांतराने हिंसक वळण धारण केले.
कोल्हापुरातील (Kolhapur Bandh) काही तरुणांनी औरंगजेबाचं आणि टिपू सुलतानचं स्टेटस ठेवलं होतं, त्यानंतर हा प्रकार घडला. त्यानंतर शहरातील काही भागात परिस्थिती तणावपूर्ण बनली. काही भागत दगडफेकीच्या घटनाही घडल्या. त्यामुळे प्रशासनाने ७ जून रोजी संध्याकाळी ५ वाजल्यापासून ते ८ जूनच्या रात्री १२ वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या कोल्हापुरातील (Kolhapur Bandh) स्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असली तरीही तणावाची स्थिती कायम आहे.
(हेही वाचा – कोल्हापुरातल्या हिंसाचाराप्रकरणी छत्रपती संभाजी महाराजांचे परखड ट्वीट; म्हणाले….)
कोल्हापूर जिल्ह्यात 19 जूनपर्यंत जमावबंदीचे आदेश
पुन्हा आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल होऊन वा स्टेटसमुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ शकतो. अहवालानुसार अपर जिल्हादंडाधिकारी (Kolhapur Bandh) भगवान कांबळे यांनी 19 जूनच्या रात्री बारापर्यंत जिल्ह्यात बंदी आदेश लागू केला आहे. त्यानुसार पाच किंवा त्यापेक्षा जादा लोक एकत्र जमा होणे, जमाव जमवणे, मिरवणुका काढणे, सभा घेण्यास बंदी आहे. तसेच लाठ्या, काठ्या वा शारीरिक इजा करतील अशा वस्तू, दगड, प्रतिमांचे प्रदर्शन, आवेशपूर्ण भाषणे, हावभाव करणे आदी प्रकारांना मनाई केली आहे.
आंदोलनाचा भाग वगळता इतरत्र परिस्थिती (Kolhapur Bandh) शांततापूर्ण आहे. तिथे नियमित व्यवहार सुरु आहेत; अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community