गेल्या काही दिवसांपासून सतत रस्ते अपघात (Kolhapur Bus Accident) होत आहेत. अशातच कोल्हापूर
येथे एक भीषण अपघात होऊन एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. गेल्या महिन्याभरातील कोल्हापुरातील बस अपघाताची ही दुसरी घटना आहे.
अधिक माहितीनुसार, (Kolhapur Bus Accident) गोव्याहून पुण्याकडे निघालेल्या खाजगी ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला आहे. कोल्हापुरातील पुईखडी येथे हा अपघात झाला आहे. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर १६ प्रवासी सुखरूप आहेत. काही जखमी प्रवासींना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
(हेही वाचा – Mithi River Project : मिठी नदी प्रकल्प: पवईतील मोरारजी नगर मधील १६६ बांधकामे हटवली)
२५ प्रवासी करत होते प्रवास
कोल्हापूर शहरातील राधानगरी रोड (Kolhapur Bus Accident) येथील पुईखडी येथे रात्री सव्वा दोनच्या सुमारास गोव्याहून पुण्याकडे निघालेल्या व्ही.आर.एल. कंपनीच्या खाजगी स्लीपर बसचा भीषण अपघात झाला आहे. या बसमध्ये तब्बल २५ प्रवासी प्रवास करत होते. रात्री सव्वादोनच्या सुमारास ही बस राधानगरी येथील पुईखडी येथे आली असता यावेळी येथे असलेल्या वळणावर बस चालकाचं बसवरील (Kolhapur Bus Accident) नियंत्रण सुटल्याने बस पलटी झाली. या बाबतची माहिती तत्काळ अग्निशमन दलाला देण्यात आली.
(हेही वाचा – NIA Raids : पंजाब, हरियाणात ‘एनआयए’चे छापे; अमेरिकेतील भारतीय वाणिज्य दूतावास हल्ला)
एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
या खाजगी स्लीपर बसमध्ये (Kolhapur Bus Accident) एकूण २५ प्रवासी प्रवास करत होते. मध्यरात्र असल्याने सर्व प्रवासी गाढ झोपेत होते. दरम्यान, ही गाडी पुईखडी येथे वळणावर आल्यानंतर बसचालकाचा बसवरील नियंत्रण सुटला असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या अपघातात दुर्देवाने पुण्यातील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला असून यामध्ये नीलू गौतम (वय ४३), रिधिमा गौतम (वय १७), सार्थक गौतम (वय १३) अशी मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे असल्याचे सांगण्यात आले आहे. (Kolhapur Bus Accident)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community