Shaktipeeth Highway तून कोल्हापूरला वगळणार ?; विरोध न मावळल्यास ‘असा’ असेल मार्ग

प्राचीन शक्तीपिठांना जोडणारा ८०५ किलोमीटर लांबीचा Shaktipeeth Highway राज्यातील १२ जिल्ह्यांमधून जाणार आहे.

74

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Mahamarg) धर्तीवर ८०५ किलोमीटर लांबीचा नागपूर गोवा (Nagpur-Goa) शक्तीपीठ महामार्ग प्रस्तावित आहे. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आणि ऐतिहासिक प्राचीन शक्तीपिठांना जोडणारा ८०५ किलोमीटर लांबीचा शक्तीपीठ मार्ग राज्यातील १२ जिल्ह्यांमधून जाणार आहे. या शक्तीपीठ महामार्गासाठी (Shaktipeeth Highway) राज्यातील २७ हजार हेक्टर जमिनी अधिग्रहित करण्याची योजना आहे. या जमिनी पिकाऊ असल्याने राज्यातील लाखो शेतकऱ्यांसह जमीन मालकांचा या महामार्गाला कडाडून विरोध आहे.

(हेही वाचा – “कोणतीही आई स्वतःच्या मुलाला मारहाण करणार नाही” ; Bombay High Court चे निरीक्षण)

मात्र या विरोधाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) आता कोल्हापुरातील (Kolhapur) प्रस्तावित संरेखन वळवून शक्तीपीठ महामार्ग कोकणाकडे कसा नेता येईल, यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. शक्तीपीठ महामार्गाला होणारा विरोध लक्षात घेऊन अखेर पर्यायी संरेखन करण्यात आले आहे. शक्तीपीठ महामार्गाला असलेला विरोध मावळला नाही, तरच पर्यायी महामार्ग MSRDC वापरणार असल्याचे सांगण्यात येत आहे. (Shaktipeeth Highway)

कसा असेल शक्तीपीठ महामार्ग ?

हा महामार्ग (Shaktipeeth Highway) राज्यातील वर्धा, नांदेड, परभणी, धाराशिव, यवतमाळ, हिंगोली, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यांतून जाणार आहे. या महामार्गावर 26 ठिकाणांवर इंटरचेंज असतील, तर 48 मोठे पूल, 30 बोगदे, आठ रेल्वे क्रॉसिंग असणार आहेत. 2025 मध्ये या महामार्गाचे भूमीपूजन होणार असून 2030 मध्ये तो सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात येणार आहे.

हेही पहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.