Kolhapur heavy rain: कोल्हापूरला पुराच्या पाण्याचा फटका; यंदा २० लाख टन उत्पादन घटणार?

202
Kolhapur heavy rain: कोल्हापूरला पुराच्या पाण्याचा फटका; यंदा २० लाख टन उत्पादन घटणार?
Kolhapur heavy rain: कोल्हापूरला पुराच्या पाण्याचा फटका; यंदा २० लाख टन उत्पादन घटणार?

कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur District) मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस (Kolhapur heavy rain) कोसळत असून, कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरस्थितीमुळे ६० ते ६५ हजार हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. यामुळे सर्वात जास्त नुसकसान हे ऊस शेतीला झाले आहे. परिणामी यंदा, आगामी गळीत हंगामात किमान २० लाख टन ऊस गाळपासाठी कमी उपलब्ध होणार आहे. तसेच शिरोळ, करवीर व कागल तालुक्यांतील साखर कारखान्यांना (Sugar mills) त्याची अधिक झळ बसणार आहे. पुरस्थितीमुळे लाखो लिटर दूध घरात राहिल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.  (Kolhapur heavy rain)

(हेही वाचा – Mulund Police Station : ‘हिंदुस्थान पोस्ट इम्पेक्ट’; विषारी गुटख्याचा ढिगारा हलवला)

मागील ०८ ते १० दिवसांपासून जोरदार पाऊस पडत असल्यामुळे कोल्हापूरात पूरस्थिती (Kolhapur heavy rain) निर्माण झाली नव्हती. पण राधानगरीसह सर्वच धरणांतून विसर्ग सुरू झाल्याने पुराचे पाणी शेतात गेल्याने हजारो हेक्टर पिके बघता बघता पाण्याखाली गेली. गेले आठ दिवस ऊस, भात, सोयाबीन ही पिके पाण्याखाली आहेत. त्यांचे नुकसान झाले असून, २०२१ च्या महापुरात जिल्ह्यातील ७४ हजार हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेले होते. (Kolhapur heavy rain)

(हेही वाचा – Election : महाराष्ट्रासोबत वायनाडमध्ये निवडणूक होणार!)

पंचनामे होणार, पण निकषाचे काय?

पुराच्या पाण्याने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे पूर ओसरल्यानंतरच सुरू होणार आहेत. शासनाच्या निकषानुसार ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांनाच भरपाई मिळते. ऊस पाण्यातून बाहेर आल्यानंतर लगेचच नुकसानाला सुरूवात होत नाही. पंधरा दिवसानंतर त्याला फुटवे फुटतात, त्यामुळे पाण्याखाली गेलेल्या सर्वच उसाला १०० टक्के भरपाई मिळणे गरजेचे आहे. (Kolhapur heavy rain)

हेही पाहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.