भारतीय पुरातत्व विभागाच्या वतीने करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या (Kolhapur Mahalaxmi Mandir) मूर्तीचं दोन दिवस संवर्धन करण्यात येणार आहे. त्यामुळे दिनांक १४ आणि १५ एप्रिल रोजी देवीचं दर्शन बंद राहणार आहे. भाविकांना दर्शनासाठी पितळी उंबऱ्याच्या बाहेर कलश आणि उत्सवमूर्ती दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने ही माहिती दिली आहे. (Kolhapur Mahalaxmi Mandir)
तातडीने संवर्धन करण्याची गरज
करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मूर्तीची (Kolhapur Mahalaxmi Mandir) झीज झाल्याने तातडीने संवर्धन करण्याची गरज असल्याचा निष्कर्ष तज्ज्ञांनी दिला आहे. मूर्ती संवर्धनासंबंधीचा दावा दिवाणी न्यायाधीश यांच्यासमोर सुरू आहे. न्यायालयीन आदेशानंतर पुरातत्त्व खात्याचे निवृत्त अधिकारी आर.एस. त्र्यंबके आणि विलास मांगीराज यांनी १४ आणि १५ मार्च रोजी केलेल्या पाहणीचा अहवाल न्यायालयात सादर केला होता. (Kolhapur Mahalaxmi Mandir)
नेमकं काय घडलं?
अंबाबाईच्या मूर्तीची (Kolhapur Mahalaxmi Mandir) गळ्या खालच्या भागाची झीज झाली होती. त्यानंतर करण्यात आलेल्या संवर्धनाच्या पाहणीसाठी न्यायालयाकडून तज्ज्ञांची समिती नेमण्यात आली होती. या समितीकडून न्यायालयात ८ पानांचा अहवाल सादर करण्यात आलाय. (Kolhapur Mahalaxmi Mandir) यात ही धक्कादायक माहिती देण्यात आली. मूर्तीची झालेली झीज २०१५ साली झालेल्या रासायनिक संवर्धनातील अवशेषांची झीजमुळे झाल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. (Kolhapur Mahalaxmi Mandir)
हे पहा –
Join Our WhatsApp Community